Homeताज्या बातम्यादेश

प्रेयसीच्या शरीराचे 50 तुकडे करून फेकले जंगलात

रांची : मुंबईतील श्रद्धा वालकर या तरूणीची आफताब या प्रियकराने तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट

बलात्कार प्रकरणातील आरोपीने घेतले पेटवून
कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही बसचा ब्रेक निकामी
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.

रांची : मुंबईतील श्रद्धा वालकर या तरूणीची आफताब या प्रियकराने तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच झारखंडमध्ये देखील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या शरीराचे तब्बल 50 तुकडे करून ते जंगली जनावरांना खाता यावे यासाठी जंगलात फेकून दिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
24 नोव्हेंबर रोजी झारखंडमधील जरियागड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोरडाग गावातील लोकांना असे काही दिसले की, त्यांना धक्का बसला. एक भटका कुत्रा मानवी हात घेऊन फिरत होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. नरेश भेंगरा असे मारेकर्‍याचे नाव आहे. तो 25 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश हा मांस कापण्याचा व्यवसाय करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे.

COMMENTS