Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपक परवाना अनिवार्य; केजमधील मंदिरांनी घेतला पुढाकार

केज । प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केज तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊड

Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)
आजबे महाराजांचे नातू संस्कार खिलारे याला राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक
Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)

केज । प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केज तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करत शिक्षक कॉलनीतील हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल-रूखमाई मंदिर आणि महादेव मंदिर यांनी अधिकृत परवाना मिळवून केज पोलीस ठाण्यात सुपूर्द केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे आणि गुप्तवार्ता विभागाचे कागदे साहेब यांच्या हस्ते परवाने सुपूर्द करण्यात आले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी सांगितले की, आवाजाची मर्यादा आणि वेळेचे भान राखणे अनिवार्य आहे. शहरातील आणि तालुक्यातील इतर सर्व धार्मिक स्थळांना कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून परवाने मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कायद्याचे पालन करून धार्मिक उत्सव आणि दैनंदिन विधी साजरे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षक कॉलनीतील मंदिर समितीने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे, असे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी नमूद केले.

COMMENTS