Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान!

औसा प्रतिनिधी - शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील भागात असलेल्या कालन गल्लीतील ऑनलाइन लॉटरी दुकानाला रविवारी रात्री 9:45 वाजण्याच्या सु

सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून निवडता येणार पर्याय
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर

औसा प्रतिनिधी – शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील भागात असलेल्या कालन गल्लीतील ऑनलाइन लॉटरी दुकानाला रविवारी रात्री 9:45 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य भस्मसात झाले. आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत दुकानातील साहित्याची राख झाली होती. या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली.
औशात अनेक वर्षांपासून कलीम शब्बीर शेख हे ऑनलाइन लॉटरी दुकान चालतात. रविवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. त्यानंतर थोड्याच वेळात दुकानाला आग लागल्याचा निरोप मिळाला. यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, एलईडी, इन्व्हटर, बॅटरी, कूलर, पंखे, टेबल, खुर्च्या, पत्रे यासह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला मात्र तो घटनास्थळी येईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानासोबतच स्थानिक तरुण धावल्याने मोठा अनर्थ टळला.

COMMENTS