Homeताज्या बातम्यादेश

प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज रविवारी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्यासोबत एनडीएमधील अन्य खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असून म

सातारच्या जिल्हा रुग्णालयात ओमिक्रॉन बाधितांसाठी अख्खा अतिदक्षता वार्ड राखीव
शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान ही संकल्पना सर्वोत्तम ठरेल – प.पू.डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज
असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज रविवारी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्यासोबत एनडीएमधील अन्य खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असून महाराष्ट्रातून एकाचे मंत्रिपद पक्के झाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल रविवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असून यामुळे सुनिल तटकरेंचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील काही खासदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिल्या खासदाराचे नाव निश्‍चित झाले झाले. अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्‍चित झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे करण्यात आले. प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यात झालेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. त्यांना कोणते खाते मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधी प्रफुल पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच मनमोहन सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरच शिवसेना शिंदे गटाकडूनही एकाला मंत्रिपद मिळू शकते. शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आदी नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर भाजपकडून नितीन गडकरी यांच्याबरोबरच नारायण राणे, रक्षा खडसे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

COMMENTS