सातारा / प्रतिनिधी : शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग नि

सातारा / प्रतिनिधी : शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग निहाय वाटप करण्यात आल्या आहेत. सरपंच पदासाठी सोडत ही प्रत्येक तालुकास्तरावर होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.
सातारा तालुक्याची सरपंच सोडत दि. 23 एप्रिल रोजी स्व. आ. श्री. छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे, जावली तालुक्याची सोडत दि. 25 एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृह, मेढा, खंडाळा तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी किसन वीर सभागृह पंचायत समिती, वाई तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, कोरेगाव तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी तहसील कार्यालय, पाटण तालुक्याची सोडत दि. 24 एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल, काळोली, फलटण तालुक्याची सोडत दि. 24 एप्रिल रोजी सजाई गार्डन मंगल कार्यालय, महाबळेश्वर तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी मध संचालनालय सभागृह, माण तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी माऊली मंगल कार्यालय, खटाव तालुक्याची सोडत दि. 23 एप्रिल रोजी बचत सभागृह पंचायत समिती वडूज व कराड तालुक्याची सोडत दि. 24 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल) येथे होणार आहे.
COMMENTS