Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेने आणलेल्या 11 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीला तिसर्‍यांदा खो ; पालिकेच्या विशेष सभेला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तिसर्‍यांदा दांडी

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर असलेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विका

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती
सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक
बारामतीची स्वप्ने दाखविणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर असलेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेली रविवारची विशेष सभा तिसर्‍यांदा तहकूब झाली. त्यामुळे शिवसेनेने आणलेल्या 11 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीला खो बसला आहे. आज तिसर्‍यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी या सभेला दांडी मारल्यामुळे गणपूर्ती अभावी ही सभा रद्द करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षांना जाहीर केले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रशासन प्रमुख सतीश दंडवते यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा तिसर्‍यांदा घेण्यात आली होती.
सभेला विकास आघाडीचे 13 सदस्य उपस्थित होते. गणपूर्ती अभावी तिसर्‍या वेळीही सभा रद्द करावी लागली. यावेळी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रस्तावित विकास कामांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी नगराध्यक्ष यांच्याकडे देण्यात आला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक सभेस का येत नाहीत हे पण ते सांगत नाहीत. शहरासाठी जे पैसे आले असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सांगतात त्यातील एक पैसाही शहरासाठी आला नाही. सभेचे पत्र देताना 13 लोकांच्या सह्या आहेत. उरलेल्याना हे मान्य नाही का? घेतलेल्या सह्यासुध्दा मॅच होत नाहीत. मग ह्या सह्या कोण करते? असा प्रश्‍नही नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी उपस्थित केला.
11 कोटी एवढा मोठा निधी आलेला असताना निधीचा विनियोग करणेसाठी, प्रभागातील कामे सांगण्यासाठी तरी उपस्थित राहणे गरजेचे होते. विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दिलेला विकास कामांचा प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले.
शहर भुयारी गटार मी उघडून पडले आहे. जनसेवा हेच आमचे ब्रीद वाक्य आहे. हे राष्ट्रवादीचे नगरसेवक विसरून गेले आहेत. शहर खड्ड्यातून मुक्त व्हावे यासाठी निधी आणला होता. सभेस विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

COMMENTS