Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्तेकामाची आ. नमिता मुंदडांनी केली पाहणी

अंबाजोगाई - प्रतिनिधी तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून माळेगावपर्यंतच्या पालखी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आ

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी सक्षम बनावे ः अभिषेक खंडागळे
मराठ्यांना ओबीसी दाखले देवू नका
भीषण अपघात… 22 जण गाडीच्या टपावरुन कोसळले | LOKNews24

अंबाजोगाई – प्रतिनिधी तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून माळेगावपर्यंतच्या पालखी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी नुकतीच या कामावर भेट देऊन गुणवत्तेची पाहणी केली आणि कंत्राटदारास आवश्यक त्या सूचना केल्या.

मध्यंतरीच्या काळात लोखंडी सावरगाव ते माळेगाव या वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या मार्गावर जवळपास 60 गावे असून खराब रस्त्यामुळे  स्थानिक ग्रामस्थांना, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अनेकांनी तर या मार्गावरून प्रवास करणे बंद करून पर्यायी मार्ग शोधले होते. लोकांची अडचण लक्षात घेत आ. मुंदडा यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून शासनाकडून या पालखी मार्गासाठी 27 कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नुकतीच आ. मुंदडा यांनी या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम अधिकाधिक मजबूत आणि उत्तम करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत केज विधानसभा प्रमुख शरद इंगळे, माजी सरपंच वैजनाथ देशमुख, बाळासाहेब जाधव, भीमा धायगुडे, दिनकर जाधव आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे साहेब आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सहकार्यामुळे लोखंडी सावरगाव ते माळेगाव या पालखी मार्गासाठी भरीव निधी मिळाला. लवकरच हा रस्ता पूर्णत्वास जाऊन स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांची त्रासातून मुक्तता होणार आहे. रस्तेकामाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही.”

COMMENTS