Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई

लोहा प्रतिनिधी - इंदिरा गांधी इंनडोअर स्टेडियम राजघाट परिसर दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ताक्वांदो स्पर्धेत लोह्याच्या वर्षा तोंडारे दिल्ली येथे

गजबजलेल्या चौकात जळतोय कचरा
बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले
नांदेडमधील अपघातात 5 जणांचा मृत्यू

लोहा प्रतिनिधी – इंदिरा गांधी इंनडोअर स्टेडियम राजघाट परिसर दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ताक्वांदो स्पर्धेत लोह्याच्या वर्षा तोंडारे दिल्ली येथे उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळविले आहे.
केंद्र सरकारच्या खेल मंत्रालया अंतर्गत स्टेअर फाउंडेशनच्या वतीने दि. 14 ते 16 एप्रिल दरम्यान इंदिरा गांधी इंनडोअर स्टेडियम राजघाट परिसर दिल्ली येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने  लोहा येथील वर्षा धम्मानंद तोंडारे या खेळाडूनी. 73 कि. ग्रा. वजन गटात कास्यपदक आपले नाव कोरले. केंद्रीय मंत्री प्रतिमा भुमीक, स्टेअर फोन्डेशनचे अध्यक्ष सिदार्थ उपाध्याय, पंतप्रधानाचे माजी स्वीय सचिव शशीकांत मिश्रा, स्टोअर्सचे प्रमुख व्यवस्थापक पारस मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील 14 राज्यातील तायक्वांदो, कराटे व योगाचे तीन हजार मुले व मुलींनी सहभाग नोंदविला. त्यात महाराष्ट्रातून 140 जणांचा तायक्वांदो पटूंचा संघ सहभागी झाला होता त्यात वर्षा तोंडारेचा ही समावेश होता. लोह्याच्या वर्षा धम्मानंद तोंडारे या महिला गटातुन दिल्लीत कास्यपदकाची कमाई कल्यामुळे त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

COMMENTS