Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री गणेश कारखान्याच्या कर्जाला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मा

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत
शंभर फूट रस्त्याचे भिजत घोंगडे अद्यापही कायम
परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात श्री गणेश कारखाना संचालक मंडळाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

श्री गणेश कारखाना हा हजारो कुटुंबांना आधार असलेली कामधेनु म्हणून ओळखले जातो. सलग दुसरा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यात कारखान्याला यश आले आहे. काळाच्या दृष्टीने स्पर्धात्मक वातावरणात नवनवीन बदल करणे आवश्यक असून त्या दृष्टीने एन सी डी सी अंतर्गत मिळणारे ७४ कोटी रुपयांचे कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून मंजूर झाले आहे. यापुढील काळात देखील कारखान्याच्या विकासात्मक दृष्टीने सहकार्य राहील असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

शेतकरी, सभासद,कर्मचारी यांच्या उन्नतीसाठी या मदतीचा मोठा लाभ होणार असून भविष्यात गणेश कारखाना हा अधिक सक्षमपणे पाऊल टाकेल. प्रयत्न आणि हेतू प्रामाणिक असेल तर निश्चित सकारात्मक गोष्टी घडतात या भावनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सहकार्य हे मोलाचे आहे. आगामी काळात जिल्ह्यातील पहिल्या पाच मध्ये श्री गणेश कारखाना येण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे कारखान्याचे मार्गदर्शक युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले. या प्रसंगी, गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधीरराव लहारे, व्हा. चेअरमन विजयराव दंडवते, संचालक नारायणराव कार्ले, भगवानराव टिळेकर, अनिलराव गाढवे, महेंद्रभाऊ गोर्डे, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, आलेश कापसे, विष्णुपंत शेळके, मधुकरराव सातव, बलराज धनवटे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, भोसले साहेब आदी संचालक उपस्थित होते.

COMMENTS