लिझ ट्रस यांचा युकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा!

Homeताज्या बातम्याविदेश

लिझ ट्रस यांचा युकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा!

अवघ्या सहा आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षात पडली फूट

लंडन :- नुकत्याच युकेच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेल्या लिझ ट्रस(Liz Truss) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ दीड महिन्याभराच्या कालावधीत म

हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
मंत्रिमंडळाचा प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही ; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाची टिप्पणी
धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा

लंडन :- नुकत्याच युकेच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेल्या लिझ ट्रस(Liz Truss) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ दीड महिन्याभराच्या कालावधीत म्हणजे 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युकेमध्ये सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे, लिझ यांच्या सरकारची आर्थिक धोरणं फसल्यानं त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. आपण यूकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहोत, असं लिझ ट्रस यांनी स्वतःच जाहीर केलं. ट्रस यांच्या आर्थिक धोरणांमुळं बाजार सावरु शकत नव्हता. तसेच ट्रस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षात फूट पडली. त्यामुळं त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला, असं रॉयटर्सनं म्हटलं आहे. उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत मी पंतप्रधान म्हणून कायम राहीन असंही लिझ ट्रस यांनी सांगितले.

COMMENTS