Homeताज्या बातम्यामनोरंजन

विदेशात राहून पाळतेय हिंदू परंपरा; प्रीति झिंटानं केला जुळ्या मुलांचा मुंडण विधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा तिचे आईपण एन्जॉय करत आहे. २०२१ मध्ये प्रीति जुळ्या मुलांची आई झाली. प्रीतिने २०१६ मध्ये जीन गुडइनफबरोबर लग

कंत्राटी वीज कर्मचार्‍यांचे राज्यभर आंदोलन
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
लग्न अटपून परतणाऱ्या गाडीचा अपघात, १५ जण जखमी | LokNews24

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा तिचे आईपण एन्जॉय करत आहे. २०२१ मध्ये प्रीति जुळ्या मुलांची आई झाली. प्रीतिने २०१६ मध्ये जीन गुडइनफबरोबर लग्न केले आणि ती कायमची लॉस एन्जेलिसमध्ये शिफ्ट झाली. लग्नाच्या ५ वर्षांनी प्रीति सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. नुकताच तिने भारतीय संस्काराप्रमाणे आपल्या मुलांचा मुंडण विधी केला आहे. दरम्यान, लग्नानंतर अभिनेत्री प्रीति झिंटा पती आणि मुलांसह लॉस एन्जेलिसमध्ये वास्तव्यास आहे. सोशल मीडियावर ती तिच्या बाळांचे फोटो शेअर करत असते. प्रीतिला जिया ही मुलगी आणि जय हा मुलगा आहे. दोघेही आता २ वर्षांचे झाले आहेत. परदेशात असली तरी प्रीतिने तिच्या परंपरा सोडलेल्या नाहीत. प्रीतिने नुकताच तिच्या दोन्ही मुलांचा मुंडण विधी केला. दोघांचा मुंडण केलेला फोटो तिने शेअर केला आहे. प्रीति आपल्या जुळ्या मुलांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते मात्र तिने आतापर्यंत एकदाही तिच्या मुलांचा चेहरा दाखवलेला नाही. मुलांचे मुंडण करत तिने त्याचे महत्त्व काय आहे यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले आहे, अखेर मुंडण सोहळा पार पडला. हिंदू धर्मात बाळाचे पहिले मुंडण म्हणजेच केस कापणे हे खूप महत्त्वाचे समजले जाते.

COMMENTS