बीड प्रतिनिधी - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीत बसण्याचा लहान मुलींचा हट्ट त्यांनी स्वतः पुरविला आहे. पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाच्
बीड प्रतिनिधी – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीत बसण्याचा लहान मुलींचा हट्ट त्यांनी स्वतः पुरविला आहे. पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत कौठळी आणि कौठळी तांडा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला जाण्याआधी काही लहानगे त्यांची वाट पाहत रस्त्यात उभे होते. यातील काहींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील होत आहे. गाडीत बसल्याचा आनंद या लहानग्या मुलींनी घेतला. तर त्यांनी पंकजा मुंडेंच्या नावाने घोषणाबाजी केली.
COMMENTS