Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाषेच्या सामन्यकरणातूनच साहित्याचा जन्म होतो- डॉ.शरद  बावीस्कर

के.एस.के.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

बीड प्रतिनिधीः- भाषा महत्वाची नसून विचार महत्वाचा असतो.साहित्य हे माणसाला माणूसपण बहाल करण्याचे काम करते. भाषेचा अभ्यास करताना भाषेसाठी सौंदर्यशा

Ukraine War: ‘आम्ही करून दाखवलं!’ , व्हिडीओ व्हायरल | LOKNews24
दिल्ली शहरात सीएनजीचे दर पुन्हा वधारले
चक्क एकाच बाईकवरून 7 जणांचा प्रवास

बीड प्रतिनिधीः– भाषा महत्वाची नसून विचार महत्वाचा असतो.साहित्य हे माणसाला माणूसपण बहाल करण्याचे काम करते. भाषेचा अभ्यास करताना भाषेसाठी सौंदर्यशास्त्रही महत्वाचे असते.प्रत्येक भाषेतील व प्रत्येक देशातील साहित्य हे समाजाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहते.साहित्याच्या अभ्यासामधूनच विचार करण्याची क्षमता निर्माण होते असते.प्रत्येक भाषेत उच्च,मध्यम,कनिष्ठ व प्रमाणभाषा यासारखे भेद असतात. भाषेचे खरे कार्य हे भावना व विचारांना अभिव्यक्त करणे हेच आहे.खर्या अर्थाने भाषेच्या सामान्यकरणातूनच साहित्याचा जन्म होतो असे प्रतिपादन जवाहर नेहरू विद्यापीठ,दिल्ली येथील फ्रेंच भाषेचे अभ्यासक व  प्रोफेसर डॉ.शरद बावीस्कर यांनी केले.
सौ.के.एस.के.महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने  न्यू लिटररी ट्रेंडस अ‍ॅण्ड नॅरेटेव्हिज इन इंग्लीश लिटरेचर या विषयावर दिनांक 17 व 18  मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन दिनांक  17 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर, बीजभाषक डॉ.शरद बावीस्कर,परिषदेचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,डॉ.दिनेश कुमार,डॉ.मरीथाई परिषद समन्वयक उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे आदींची विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी उदघाटक म्हणून संबोधित करताना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, आज इंटरनेटच्या युगामध्ये साहित्यात देखील नविन माध्यमांचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. शिक्षण क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. इंग्रजी भाषेचा वापर अधिक प्रमाणावर होत आहे. या माध्यमांचा सकारात्मक व नकारात्मक दृष्टीनेही समाजमनावर परिणाम होताना दिसतो.माध्यमांच्या या वाढत्या प्रभावामुळे वाचन कमी झाले आहे व स्क्रीनवरील वाचनाचे प्रमाण वाढले आहे.परंतू जो भावनिक बंध पुस्तकाच्या प्रत्यक्ष वाचनातून मिळतो.तो स्क्रीनवर मिळत नाही,मिळणार नाही. आज विविध भाषेतील साहित्य भाषांतराच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषेत पोहोचले असल्याचे त्यांनी नमूद करून परिषदेस शुभेच्छा दिल्या. बीजभाषक म्हणून डॉ.शरद बावीस्कर परिषदेस संबोधित करताना पुढे म्हणाले की, शिक्षण व साहित्याच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती निर्माण होणे आवश्यक असते. विदेशात खर्या अर्थाने विज्ञान जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी व त्या विकसीत करण्यासाठी शिक्षण व्यवस्था पुढाकार घेते. मात्र आपल्याकडे विचार करू न देण्याची परंपरा आहे आणि ही बाब वैचारिकतेला मारक ठरताना दिसते.आपल्याकडे शिक्षणाविषयी जागरूकता  अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात विकसीत झालेली नाही. आपण शिक्षण घेण्याचे व देण्याचे  केवळ नाटक करत आहोत व त्या विषयी मोठी उदासीनता आपल्या व्यवस्थेत असलेली दिसते. याविषयी  डॉ.शरद बावीस्कर यांनी खंत व्यकत केली. संशोधक,विद्यार्थी,प्राध्यापक यानी डॉ.बावीस्कर यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व त्यांचे प्रसिध्द भूरा या आत्मकथनाच्या प्रवासाविषयी देखील भाष्य केले. यावेळी अमेरिकेतील प्रोफेसर जेमि विस्टम कॉलबर्ट यांनी  साहित्यातील लुप्त होत असलेल्या  कला प्रकाराविषयी ऑनलाईन विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले .अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनडॉ.श्रीमंत तोंडे यांनी केले तर आभार डॉ.अन्सारउल्ला खान यांनी मानलेे.यावेळी आंतरराष्ट्रीय परिषदेस डॉ.वसंत सानप, डॉ.विष्णू पाटील,प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे,उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, डॉ.रमाकांत निर्मळ,डॉ.अब्दुल अनिस, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

COMMENTS