Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लायन्स क्लब राहता अध्यक्षपदी इंजि. प्रकाश सदाफळ

राहाता प्रतिनिधी ः राहाता लायन्स क्लब ची सर्वसाधारण सभा लायन्स क्लब राहाता अध्यक्षा अंजली उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ला. डॉ.संजय गा

माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर महानगरपालिकेचे लक्षणीय यश
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील तणावप्रकरणी सात गुन्हे दाखल
मयताच्या वारसाला न विचारता जमिनीची बेकायदा विक्री

राहाता प्रतिनिधी ः राहाता लायन्स क्लब ची सर्वसाधारण सभा लायन्स क्लब राहाता अध्यक्षा अंजली उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ला. डॉ.संजय गायकवाड यांनी सर्वांचे मान्यवरांचे स्वागत केले. लायन्स क्लबने आरोग्य विषयक जनजागृती व आरोग्य शिबीर घेवून गरीब लोकांची लायन्स क्लबमार्फत सेवा करण्याचा भाग्य मिळाल्याचे उबाळे यांनी यावेळी बोलून दाखवले. उपाध्यक्ष इंजी. प्रकाश सदाफळ यांनी लायन्स क्लब मधील मागील वर्षाच्या कामकाज बाबत माहिती दिली. ला.ऍड. संतोष घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. गोरखतात्या दंडवते यांनी लायन्स क्लब ने खूप छान  काम केले व या पुढे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे व सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षा अंजली उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्वांचे मनापासून आभार मानले व सर्वांनी सहकार्य केले म्हणून आपला क्लब ने 32 क्टिव्हिटी केल्या व डिस्ट्रिक्ट मध्ये लायन्स क्लब चे नाव  उत्तम रिजन मध्ये आपल्या क्लब्ला सर्वात जास्त पारितोषिके मिळाली. ला.सुधीरजी दागा रिजन चेआरमन, डॉ.संदीप गोंदकर झोन चेअरमन यांनी वर्षभर  खूप मोलाचे सहकार्य केले,त्यामुळेच आम्ही चांगले काम करू शकलो, या नवीन कार्यकारिणीला सर्वांनी सहकार्य करावे असे म्हटले,लायन्स क्लब राहता चे अडमिनिस्ट्रेटर तथा डिस्ट्रिक्ट चैअरमन डॉ.संजय उबाळे यांनी सर्वांना दिलेल्या पदाची कर्तव्य व जबाबदारी या बाबत व लायन्स इंटरनॅशनल बाबत सविस्तर माहिती दिली. लायन्स क्लब राहाता 2024-25 ची कार्यकारिणी खालील प्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रेसिडेंट ला. इंजिनियर प्रकाश सदाफळ, सेक्रेटरी ला. ऍड दिनेश कारले, ट्रेझरर ला. व्यंकटेश अहिरे, फर्स्ट वाईस प्रेसिडेंट ला. डॉ संजय गायकवाड, व्हाईस प्रेसिडेंट ला.सचिन मुरादे, व्हाईस प्रेसिडेंट ला  राजेंद्र बांगर, एमिजियाट प्रेसिडेंट लायन्स अंजली उबाळे, एलसीआयएफ कॉर्डिनेटर लायन दीपक दंडवते, पीआरओ ला गोरख तात्या दंडवते, क्लब सर्विस चेअरमनला रतन चौधरी, मेंबरशिप चेअरमन ला विजय धनवटे,जीएसटी चेएरपर्सन ला डॉ प्रज्ञा गायकवाड,क्लब लीडरशिप चेअरमन ला.सो अर्चना दंडवते, क्लब मार्केटिंग चेअरमन ला. ऍडव्होकेट संतोष घोडके, टेल्टविस्टर ला स्मिता मुरादे,टेमर ला.आसावरी बेंद्रे,पब्लिसिटी ला किरण वाबळे, ला सागर सोमवंशी, डायरेक्टरला डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, ला दसरथ तुपे, ला विद्या चौधरी, ला लता जाधव, वरीलप्रमाणे 2024 ते 25 साठी लायन्स क्लब राहाता शहराची कार्यकारणी करण्यात आली. लाइन्स क्लब राहाता यांच्या वतीने मागील वर्षात अनेक समाज उपयोगी कामे करण्यात आली गरीब व गरजू मुलांना मदत करणे ,कॅन्सर निदान व रक्त तपासणी शिबिर, डेंटल क्लिनिक, सायकल बँक, वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान, गरीब मुलींना कपडे वाटप अशा अनेक सामाजिक कामे केल्यामुळे राहाता क्लब नेहमीच समाजामध्ये एक आदर्श क्लब म्हणून गणला जात आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दसरथ तुपे यांनी केले.

COMMENTS