Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘रेषा बोलतात…रेषा हसवतात !’ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्यंगचित्रांचा अनोखा कार्यक्रम.

संगमनेर - बप्पाजी सार्वजनिक वाचनालय, जि.प. शाळा,शेकटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने 'रेषा बोलतात..

डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांप्रती अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील रहावे : डॉ.पंकजा आशिया
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी : मुख्यमंत्री फडणवीस
Displaying shektephototwo.jpeg

संगमनेर – बप्पाजी सार्वजनिक वाचनालय, जि.प. शाळा,शेकटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने ‘रेषा बोलतात…रेषा हसवतात !’ या नावाने व्यंगचित्रातून विद्यार्थ्यांना प्रबोधन करणारा अनोखा आणि उपयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणीक आणि नैतिक विषयावर आधारित व्यंगचित्रांचे अरविंद गाडेकर यांनी सादरीकरण केले.  कार्टूनच्या हलक्या – फुलक्या शैलीत गंभीर संदेश सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यामागे होता.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यंगचित्राचे अर्थ ,त्यामागील संदेश आणि जीवनातील त्यांच्या उपयोगावर सादरीकरणातून संवाद साधला. रेषांतून व्यक्त होणाऱ्या भावना , विनोद आणि वास्तव यांचे सुंदर मिश्रण पाहून विद्यार्थी विशेषतः आनंदित झाले.  व्यंगचित्रकलेचा या प्रबोधनपर कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली असून सामाजिक भान जागृत करणारा हा उपक्रम सर्वांचे कौतुकास पात्र ठरला. या कार्यक्रासाठी संगमनेर येथून दिलीप उदमले, बाळकृष्ण महाजन , ज्ञानेश्वर गोंटे, डॉ.मोटेगावकर हे उपस्थित होते. यावेळी दिलीप उदमले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र कार्यवाहक सुमित्रा घुले मॅडम, मुख्याध्यपिका आव्हाड मॅडम , शिक्षिका  खेडकर , शेळके, देशमुख ,  शिक्षक गोपाळे व खेडकर व डमाले सर यांनी खूप परिश्रम घेतले.

COMMENTS