चकलांबा प्रतिनिधी- चकलांबा व चकलांबा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत खंडित हो
चकलांबा प्रतिनिधी- चकलांबा व चकलांबा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
चकलांबा परिसरात पाऊस पडल्यावर किंवा वारा सुटल्यावर नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होतो, याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.मागील आठ ते दहा दिवसांपासून वीज ये जा करत आहे. कधी तर दिवसभर वीज येत नाही. कधी रात्र भर विज नसते. सकाळी पहाटे तार तुटली तर तिला जोडण्यासाठी दुपारी एक वाजवतात आणि विज पुरवठा खंडित होण्यासाठी दोन वाजतेत असे, असल्याने नागरिकांचे हाल सुरू होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,पिक विमा , तलाठी भरती फार्म भरणे सूरू आहे यासह विविध कागदपत्रे काढावी लागतात. अशा वेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ही कागदपत्रे काढताना अडचणी निर्माण होत आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्व कामकाज ठप्प होत आहे. तसेच उद्योग व्यवसायावर देखील याचा परिणाम होतो. अशा वेळी लाईनमन जयदीप ढगे फोन घेत नाहीत. सबस्टेशन ला फोन केला की लाईट वरुन गेली असे सांगितले जात आहे. यामुळे ग्रामस्थामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की, वरून म्हणजे नेमकी कुठून गेली ? याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्याने लक्ष घालुन हा सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा.अशी मागणी चकलांबा ग्रामस्थ करीत आहेत.
COMMENTS