Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिली तीन हजाराची उचल अमान्य : स्वाभीमानीचे रणशिंग; दोन कारखान्यांना निवेदन

स्वाभिमानीकडून मोर्चासह हवा सोड आंदोलनस्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढील टप्प्यात शिवनेरी आणि जरंडेश्‍वर साखर कारखान्यांविरोधातही हल्लाबोल आंदोलन

विखे व श्री गणेश कारखान्याच्या कामगारांना तीन हप्त्यात थकीत देयके द्या : उच्च न्यायालय
राजारामबापू कारखान्यातर्फे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणास महिला रवाना
वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट

स्वाभिमानीकडून मोर्चासह हवा सोड आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढील टप्प्यात शिवनेरी आणि जरंडेश्‍वर साखर कारखान्यांविरोधातही हल्लाबोल आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही कारखान्यांनीही दर न जाहीर करता गाळप हंगाम सुरू केल्यामुळे स्वाभिमानीकडून त्यांच्यावर मोर्चा आणि हवा सोड आंदोलन करण्यात येणार आहे.

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये, अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. मात्र तरीही दर जाहीर न करताच काही कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
गोपूज येथील ग्रीन पॉवर कारखाना आणि घाटमाथा येथील वर्धन कारखान्यांना संघटनेतर्फे निवेदन देऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, संपर्कप्रमुख शरद खाडे, पक्षाध्यक्ष वैभव पाटील, संघटक संतोष तुपे, सुखदेव पवार, सागर गोडसे, युवा नेते महेश करचे, विकास गोडसे, राजेंद्र पवार, राजू जाधव, सत्यवान गलंडे, हेमंत गोडसे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर-सांगली परिसरातील ऊस दराचा अंदाज घेऊन खटाव व परिसरातील कारखान्यांनी त्याचप्रमाणे दर द्यावा. तसेच तीन हजार रुपयांची पहिली उचल आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही, असा खणखणीत इशारा देण्यात आला. यावेळी सांगली-कोल्हापूरच्या धर्तीवर ऊस दर ठरवावा, अन्यथा ऊस तोड बंद, रस्ता रोको आणि मोर्चा आंदोलन छेडण्याची तयारी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले आहे.
तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे म्हणाले, साखर आणि उपउत्पादनांमधून कारखान्यांना प्रतिटन सुमारे 5000 ते 5500 रुपयांपर्यंत लाभ मिळत आहे. त्यापैकी उत्पादन व वाहतूक खर्च वजा केल्यास शेतकर्‍यांना किमान 3500 ते 3700 रुपये देता येणे शक्य आहे. त्यामुळे कमी दरावर ऊस देणार नाही, हे मी ठामपणे व जबाबदारीने सांगतो.

COMMENTS