Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छोटा राजनला जन्मठेप

जया शेट्टी हत्याकांड प्रकरणात सीबीआय न्यायालयाचा निकाल

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजनला गुरूवारी सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरण

बदलापुरात तरुणावर तलवारीने वार
मुंबईत मॉडेलकडून सेक्स व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग
मुंबईत 2053 लोकांना बनावट लस l पहा LokNews24

मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजनला गुरूवारी सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणात ही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. राजनला कोर्टाने दोषी ठरवण्यात आले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी गुंड छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिक होत्या.
मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालकीण होत्या. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी टोळीकडून फोनही येत होते. जया शेट्टीने खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. जया शेट्टी यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हिची हत्या 4 मे 2001 रोजी झाली होती. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची हत्या केली होती. छोटा राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टींकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील इतर आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना कोर्टाने वर्ष 2013 मध्येच दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता या प्रकणात छोटा राजन यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

COMMENTS