Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खून केलेल्या आरोपीस जन्मठेप आणि एक लाखाचा दंड

पुणे : प्रेयसीबरोबर फिरत असल्याने तरुणाचा निर्घृण खून करणार्‍या एकास सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुन

बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने मानले आभार
संजय राऊतांनी केला राणेंविरोधात अबु्रनुकसानीचा दावा
नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी : माजी आमदार कळमकर

पुणे : प्रेयसीबरोबर फिरत असल्याने तरुणाचा निर्घृण खून करणार्‍या एकास सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून, त्याचा खून करून, मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आल्याची घटना स्वारगेट भागात घडली होती. निजाम असगर हाश्मी (वय 19, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.
उमेश भीमराव इंगळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक बसवराज उजने यांनी फिर्याद दिली होती. 19 जून रोजी कोंढवा भागात मृतदेह सापडला होता. शिर धडावेगळे करण्यात आले होते. खून प्रकरणाचा तपास करुन कोंढवा पोलिसांनी आरोपी निजामला अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून 24 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. आरोपीकडून खून करण्यासाठी वापरलेला सत्तुर, तसेच उमेश इंगळेचे पॅनकार्ड जप्त करण्यात आले होते. हाश्मी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. उमेश तरुणीबरोबर फिरत असल्याने निजाम त्याच्यावर चिडून होता. त्याने रमजान ईदच्या दिवशी उमेशला शीरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्याच्यावर सत्तुरने वार केले. उमेशचे शीर धडावेगळे करुन मृतदेह कोंढवा भागात टाकण्यात आला होता. शीर स्वारगेट येथील कालव्यात टाकून देण्यात आले होते. कोंढवा पोलिस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक संतोष शिंदे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजात उपनिरीक्षक समाधान मचाले, सहायक फौजदार महेश जगताप, शिपाई अंकुश केंगले यांनी सहाय्य केले.

COMMENTS