Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करणा-या संवेदनाहीन आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाईसाठी डॉ.सुरेश साबळे यांना निवेदन

शिस्तभंग कारवाईचा डॉ.साबळेंचा ईशारा

बीड प्रतिनिधी - वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करत अपघातग्रस्त ऊसतोड मजुर तडफडत असताना त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी घोषणाबाजी करत उपचारादरम्यान ह

ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान
केडगाव येथे जावयाकडून सासू सासरे व पत्नीस बेदम मारहाण
शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी कर्जत पोलिसांकडून उस्मानाबादमधून जेरबंद

बीड प्रतिनिधी – वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करत अपघातग्रस्त ऊसतोड मजुर तडफडत असताना त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी घोषणाबाजी करत उपचारादरम्यान हलगर्जीपणा करत हेळसांड केल्याबद्दल संबधित आरोग्य कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,मुक्तपत्रकार संतोष ढाकणे, बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस, तालुका सहसचिव मिलिंद सरपते, तालुका सचिव शेख मुस्ताक यांनी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे,जिल्हाधिकारी बीड यांना केली  आहे.
 दि.16 मार्च 2023 वार गुरुवार रोजी सोलापूर जिल्ह्यातील बसवेश्वर कारखाना येथील ऊसतोडणी वरुन गावी परतणा-या मजुरांच्या ट्रकला ( वाहन क्रमांक एमएच 23  5832 व  (एमएच 09 बीए 5551 ) यांची तेलगाव जवळ धडक होऊन अपघातात  40 मजूर जखमी झाले. त्यापैकी 16 गंभीर जखमी झाले असून मजुरांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र रूग्ण वाहिकेसमोर आरोग्य कर्मचा-यांचे आंदोलन सुरू होते ,कर्मचारी जोराजोरात घोषणा देत होते. दुस-या बाजुला जखमींना रूग्ण वाहिकेतुन खाली घेण्यासाठी कोणीही नव्हते सोबत आलेल्या महिला मजुरांनीच त्यांना स्ट्रेचरवरून खाली घेतले. रक्तस्त्राव झाल्याने अनेकांना भोवळ येत होती. काहींना मुका मार होता.  जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.संतोष शहाणे व ईतर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना एक्स रे व सिटीस्कॅनचा सल्ला दिला होता परंतु या विभागाला कुलूप होते त्यामुळेच सर्व रूग्ण बाहेरच्या बाकड्यावर बसलेले दिसले. वेळेवर उपचार मिळत नसल्याने जखमींना अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले. रुग्णांची हेळसांड झाली. बीड  जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त ऊसतोड मजूर रूग्ण वाहिकेद्वारा जखमी अवस्थेत आलेले असताना रुग्णालयाच्या दारासमोर आंदोलन कर्ते घोषणा देत होते.  .गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचे गांभीर्य त्यांना नव्हते त्यामुळेच   ही वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी गोष्ट असुन संबंधित आरोग्य कर्मचार्‍यांची संवेदनहिनता निषेधार्ह आहे.  संपात सहभागी असलेल्या रूग्णालयातील गट क व गट ड कर्मचा-यांना संपात सहभागी न होता  रूग्णालयात कर्तव्यावर 2 तासात रूजु न झाल्यास शासन परिपत्रकानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979  अन्वये शिस्तभंगाची  कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा नोटीस द्वारे ईशारा दिला आहे.

COMMENTS