मेष - आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. कार्यक्षेत्रात नवीन अधि
मेष – आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील. आततायीपणा करून चालणार नाही. शुभ रंग नारंगी शुभ अंक ७
वृषभ (Taurus):- बोलण्यात खंबीरपणा ठेवावा. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. मित्रांची संगत तपासून पहा. शुभ रंग काळा शुभ अंक ५
मिथुन (Gemini):- आवडत्या व्यक्तीची भेट होईल. काही निर्णयासाठी थांबावे लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल. शुभ रंग पिवळा शुभ अंक ३
कर्क (Cancer):- जोडीदाराच्या मताचा विचार करा. आळसात दिवस ढकलू नका. नवीन ओळखीचा लाभ होईल. भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा. शुभ रंग हिरवा शुभ अंक १
सिंह (Leo):- डोके शांत ठेवून काम करावे. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. माणसे ओळखायला शिकावे. शुभ रंग निळा शुभ अंक ९
कन्या (Virgo):- अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. शुभ रंग लाल शुभ अंक ४
तूळ (Libra):- आपला दिवस आनंदात जाईल. लहान प्रवासाची शक्यता. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. सर्व गोष्टींची खातरजमा करावी. शुभ रंग विटकरी शुभ अंक ६
वृश्चिक (Scorpio):- कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. महिला सहकार्यांची उत्तम साथ मिळेल. नवीन गोष्टी जाणून घेता येतील. शुभ रंग जांभळा शुभ अंक ५
धनू (Sagittarius):- जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभ रंग पांढरा शुभ अंक ८
मकर (Capricorn):- आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आजचा दिवस चांगला जाईल. शुभ रंग पोपटी शुभ अंक ४
कुंभ (Aquarius):- मानसिक प्रसन्नता लाभेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग. शुभ रंग गुलाबी शुभ अंक २
मीन (Pisces):- घेतलेला निर्णय योग्य ठरेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. धार्मिक आवड वाढीस लागेल. तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल. शुभ रंग निळा शुभ अंक ६
COMMENTS