Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहभेटीच्या माध्यमातून मतदानाचे प्रमाण वाढवूया

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन

अहमदनगर ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता 50 टक्के पेक्षा कमी टक्के मतदान असलेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत

देवाला कोंडण्याचे पाप सरकार करीत आहे ; भाजपचा आरोप
आमदार व नगराध्यक्षना प्रसिद्धीची हौस नाही- नगराध्यक्ष वहाडणे
चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात

अहमदनगर ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता 50 टक्के पेक्षा कमी टक्के मतदान असलेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघरी भेटी देण्यात याव्यात. गृह भेटीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांसोबत आरोग्य सेवक , अंगणवाडी सेविका , महिला बचत गट  ,सहकारी संस्थांचे कर्मचारी वर्ग-प्रतिनिधी यांचा गट तयार करण्यात यावा .या प्रत्येक गटावर साधारणतः एका मतदान केंद्रातील मतदारांच्या जनजागृतीची जबाबदारी असेल.यातून मतदानाचे प्रमाण वाढवून आपण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

            मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाच्या वतीने राज्यामध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रस्तरावर मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांसह विविध क्षेत्रातील सुमारे 3 ते 4 कर्मचार्‍यांची एक टीम तयार करावयाची असून त्या टीमला किमान तीनशे कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सालीमठ यांच्या निर्देशानुसार या गृहभेटी 50% पेक्षा कमी मतदान असणार्‍या केंद्रांवर प्राधान्याने करण्यात याव्यात.त्यासाठी गृहभेटी द्यायला जाणार्‍या कर्मचार्‍यांसाठी  मार्गदर्शक सूचना नियमावली , मतदार यादी आणि गृहभेटीचे क्षेत्र यावर आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे . त्यामध्ये मतदारांच्या नकारात्मक उदासीन भूमिकेला सकारात्मक करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच लोकशाही शासन व्यवस्था अबाधित राहण्यासाठी मत देणे किती महत्त्वाचे आहे, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने मतदारांचा कसा फायदा होणार आहे हे सांगून मतदारसंघांमध्ये उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न या टीमला करायचा आहे.  

मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांनी जारी केलेल्या नियमावली मध्ये गृहभेटी या उपक्रमासाठी टीम तयार करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी , गृहभेटीत मतदारांपर्यंत कसे पोहोचावे व गृहभेटीत टाळावयाच्या बाबी तसेच मतदान दिनाला लक्षात घ्यावयाच्या बाबी आणि अहवालाचे सादरीकरण आदी विविध मुद्द्यांवर विस्तृत माहिती देण्यात आली असून संबंधित विभागांना ही नियमावली पाठवण्यात आली आहे. तसेच गृहभेटीचा रोजच्या रोजचा अहवाल सुमारे 6 विशेष मुद्द्यांमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावयाचा असून जिल्हा पातळीवरील गोषवारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्वीप कक्षाकडे सादर केला जाणार आहे. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS