Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून सक्षम व स्वयंपूर्ण भारत घडवूया – प्रकाश कोल्हे

नाशिक प्रतिनिधी - विज्ञान दिनाचे औचित्य साधत मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळा येथे 'प्रयोग

दैनिक लोकमंथन l भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळः थोरात
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा
शेअर बाजारात तेजी… सेन्सेक्सने मारली मोठी उसळी…

नाशिक प्रतिनिधी – विज्ञान दिनाचे औचित्य साधत मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळा येथे ‘प्रयोगशील विज्ञान प्रदर्शन’ भरविण्यात आले. प्रयोगशील यासाठी कि, विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग कार्यान्वित करून त्याचे निष्कर्ष पडताळून प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव तथा मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, उपमुख्याध्यापिका पूनम पाटील, परीक्षक दिप्ती पाटील व प्राजक्ता साटोणे आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम गुळवे यांनी केले. शुभेच्छा देताना ज्योती कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. कार्यक्रम व उपक्रमांचे संकल्पक संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी सांगितले की, विज्ञानाशिवाय आपण जगूच शकत नाही. कोणत्याही घटनेचा, गोष्टीचा कार्यकारणभाव शोधणे म्हणजे विज्ञान. दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणी , समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी केलेला शोध, प्रयोग, संशोधन केल्याने आपण एक सजग नागरिक म्हणून राष्ट्राच्या कल्याणासाठी कार्य करू.’

       विद्यार्थ्यांनी यावेळी विविध विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केले. जैविक, रासायनिक, भौतिक, खगोलीय, अवकाश विविध विज्ञान शाखांवर आधारित  प्रयोग सादर केले. गुरुवर्य डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन कार्यपूर्तीला मानवधन संस्थेचे ध्येय मानून त्याच्या कार्यपूर्तीसाठी सातत्याने विज्ञानधिष्टीत कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक व्याख्यानमाला, जेष्ठश्रेष्ठ शास्त्रज्ञांची भेट आयोजित केली जाते. अटल टिंकरींग लॅब, व्हल्यू लॅब, युनिक स्किल सेंटर या मुलांच्या कौशल्याला  वैज्ञानिक परीघ देण्याचे कार्य करीत आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान यांची जोड शिक्षणाला देऊन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात जी सम्यक क्रांती घडविली आहे तिचा परिपाक म्हणजे मानवधन संस्थेत नुकतीच संपन्न झालेली  ३१ वी राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद होय.

      विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन शिक्षक प्रतिनिधी यांनी केले. पालक व विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS