Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे.

आशाताईं गवळी यांनी घातले देवांना साकडे

नेवासाफाटा/प्रतिनिधीः  अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार अरुणभाई गवळी यांच्या पत्नी आशाताई अरुणभाई गवळी या संभाजीनगर आणि बिडच्या

आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न
मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे

नेवासाफाटा/प्रतिनिधीः  अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार अरुणभाई गवळी यांच्या पत्नी आशाताई अरुणभाई गवळी या संभाजीनगर आणि बिडच्या दौर्‍यावर असतांना त्यांनी संभाजीनगर येथील श्रीक्षेञ घृश्‍नेश्‍वर मंदिरात हजेरी लावून अभिषेक घातला. दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे असे देवांना त्यांनी साकडे घातले. त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथ व अंबाजोगाई येथील देवीमातेचेही दर्शनही यावेळी घेतले.
यावेळी आशाताई गवळी यांनी राज्यात वेळेवर पाऊस होऊन दुष्काळ सदृष्य परिस्थितीच्या सावटातून बाहेर काढून बळीराजाला सुखी होण्यासाठी यावेळी त्यांनी देवीमातेला साकडे घातले. आशाताई गवळी या दौर्‍यावर येत असल्यामुळे मोठ्या संख्येने अखिल भारतीय सेनेचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आशाताई अरुणभाई गवळी यांचा यावेळी सन्मान केला. महाराष्ट्रात पावसाळा सरत आला, तरीही राज्याच्या काही भागात दृष्काळसदृष्य परिस्थिती असल्यामुळे बळीराजाला संकटातून मुक्त करण्यासाठी यावेळी आशाताई गवळी यांनी साकडे घातले. यावेळी अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी  आशाताई गवळी यांचे यावेळी जोरदार स्वागत केले.

COMMENTS