Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्र पूर्ववत राहू द्या !

 नव्वदीच्या दशकात मुंबईत हिंसाचाराचा थरार असणाऱ्या गँगस्टरचा खात्मा मुंबई पोलिसांनी करताच, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था दीर्घकाळ सुरळीत आह. मात्

अधिक आणि अधिक राजकारणात वजाही होते !
तर, समान नागरी कायद्याचा बडगा येणार!
दसरा मेळाव्याचा संघर्ष !

 नव्वदीच्या दशकात मुंबईत हिंसाचाराचा थरार असणाऱ्या गँगस्टरचा खात्मा मुंबई पोलिसांनी करताच, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था दीर्घकाळ सुरळीत आह. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काल मुंबईसारख्या भागांमध्ये देखील गुन्हेगारांची मानसिकता गुन्हे घडवण्यासाठी कशी सहजपणे तयार असते, याचं पुन्हा एकदा एका व्हिडिओ मधून प्रचिती आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदारांचा पुत्र, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर  यांच्याशी मैत्रीचा संबंध निर्माण करून, लाईव्ह फेसबुक वर मॉरिस नावाच्या एका गुंड असलेल्या भाईने गोळ्या झाडल्या आणि अभिषेकचे जीवन कायमचे संपवले. तर, दुसऱ्या बाजूला गोळ्या झाडणारा मॉरीस हा लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसत नसल्यामुळे, त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. कोणत्याही समाज जीवनामध्ये किंवा राज्यव्यवस्थेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसेल तर, हिंसाचार उफाळणे ही अगदी सहज बाब असते. त्यातही अलीकडच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जीवनपद्धतीमध्ये मतभेद हे कधी शत्रुत्वात रूपांतर होतील, याची काहीही हमी आणि शाश्वती देता येत नाही! परंतु, अलीकडच्या काळात एक झटपट मानसिकता जी निर्माण झाली आहे,

त्या मानसिकतेचा प्रत्यय गुन्हेगारी घटनांमध्ये येऊ लागला आहे! समाजजीवन हे शांततामय पद्धतीने पुढे जावं, लोकांचा-पर्यायाने समाजाचा आणि त्यायोगे राज्याचा आणि अर्थातच देशाचा विकास व्हायचा असेल तर, कायदा आणि सुव्यवस्था याची काटेकोर अंमलबजावणी होणे फार गरजेचे आहे. सरकार हे नागरिकांचे मायबाप असते, अशी पूर्वपार चालत आलेली म्हण आहे! सरकार मायबाप असते म्हणजे नागरिकांचा ते पालक असतात. सरकार नावाच्या संस्थेकडे सर्वाधिकार असतात. राज्यातील सर्व प्रकारची व्यवस्था कशी ठेवण्यात यावी, राज्याचं अर्थनियोजन कसं असावं, राज्यातल्या महागाई- बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवावा, या सगळ्या बाबी सरकारच्या अधीन असतात. सरकारने लोकांच्या या प्रश्नावर अधिक विचार करून वेळ दिला तर, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आपोआपच व्यवस्थित राहते. कायदा आणि सुव्यवस्था मोडीत काढण्याचे काम हे एक प्रकारे ज्यांच्या गुन्हेगारी कृत्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, अशी लोक करत असली तरी, प्रशासनाचं त्याकडे होणारी डोळेझाक ही प्रसंगी प्रश्नार्थक म्हणून आपल्यासमोर उभे राहते. महाराष्ट्र हे देशातील अतिशय अव्वल आणि प्रगत राज्य आहे. या राज्यातली जनता ही अतिशय शांत आणि संयमी आहे. रोजगारासाठी आपल्याला मिळेल तेवढ्या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये समाधान मानून, महाराष्ट्राचे लोक जीवन व्यतीत  करत असतात. कोणाचं ओरबाडून घेणं किंवा कोणाकडून चुकीच्या गोष्टी करून घेणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही. महाराष्ट्राचा माणूस हा सोज्वळ, शांत, उदार आणि दिलदार मनाचा आहे. याचं कारण महाराष्ट्र ही समतावादी संतांची आणि आधुनिक जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता चे मूल्य देणारे फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीत कोणताही विचार हा समतेचा असावा आणि तो शांततेच्या मार्गाने प्रस्तुत केला जावा, ही पूर्व अट असते. त्यामुळे महाराष्ट्रात देशाच्या तुलनेने सर्वाधिक जर काय चालत असेल तर, ते म्हणजे प्रबोधनाच्या चळवळी. समाज मनावर कायम चांगले विचार सांगून समतेचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे विचार सांगून समाजाची मानसिकता इथे कायम त्या विचारांच्या दिशेने घडविली जाते, बनविली जाते.  याच मानसिकतेतून महाराष्ट्रात सामाजिक वातावरण त्या पद्धतीचे निर्माण झाले आहे.  जे सामाजिक वातावरण, ज्या भौगोलिक भागात असते त्याच प्रकारचे राजकारण तिथे निर्माण होते. किंबहुना, त्याच पद्धतीची राजकीय सत्ता तिथे कार्यरत होते. महाराष्ट्र ही संतांच्या समतावादी विचारांची आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या स्वातंत्र्य समता आणि बंधूतेच्या मूल्यांची भूमी आहे. पण, ही भूमी गेल्या काही वर्षापासून एक तणावग्रस्त वातावरण अनुभवते आहे. एक प्रकारे गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये पुन्हा उद्रेक उभा करतोय की काय, अशी परिस्थिती वाटायला लागली आहे. मुंबईच्या दहिसर परिसरातील फेसबुक लाईव्ह वर झालेला खून, हा अशाच प्रकारच्या महाराष्ट्राला दर्शवतो आहे. महाराष्ट्र सांभाळताना त्याला सावरणं आणि ते आपल्या पालकत्वाच्या आपुलकीने सांभाळूणे खरेतर सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पेलण्यास किंवा सांभाळण्यास ज्या ज्या वेळी सरकार असमर्थ सिद्ध होईल, त्या त्या वेळी सरकारच्या विरोधात लोकांचा आवाज उठेल. तीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र हा पूर्ववत समतेची भूमी, स्वातंत्र्याची भूमी आणि बंधुतेची भूमी म्हणून जर आपल्याला ठेवायची असेल तर फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे वर्चस्व निर्माण करून किंबहुना तो आहे तसाच ठेवून किंवा आहे त्यापेक्षा पुढे नेऊन या भूमीवर तो विचार मजबूत करणे, हे आता सामान्य समाज म्हणून आपल्यासमोरही आवाहन आहे. म्हणून सत्तेवरही त्याची जबाबदारी आहे

COMMENTS