Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन दिवसापासून बिबट्याचा वापर असून, हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मात्र तरीही बिबट्याच

मुस्लिम आरक्षण मिळावे ः मंत्री सत्तार
…तर, मविआच्या सभेला परवानगी नाही
मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल – आशुतोष गोवारीकर

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन दिवसापासून बिबट्याचा वापर असून, हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मात्र तरीही बिबट्याचा मागमूस लागत नसल्यामुळे वनविभागाची चांगलीच धांदल उडाली आहे. त्यामुळे बिबट्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात आणि आता थेट एका मॉलच्या सीसीटीव्ही बिबट्या कैद झाला आहे. मागील तीन दिवसांपासून वनविभागाकडून 70 ते 80 कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करूनही बिबट्या सापडला नसल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  उल्कानगरी परिसरातील एका अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील गजबजलेल्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने परिसरातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे बिबट्या आता कुठे धरून बसलाय असा वनविभागालाही प्रश्‍न पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हासह पुणे व नाशिक जिल्ह्यातील रेस्क्यू पथकेही बिबट्याचा मागवा काढण्यासाठी उल्कानगरी सह शहरातील इतर ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. जवळपास 80 ते 90 कर्मचार्‍यांचा फौज फाटा शहरात बिबट्याला पकडण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. वनविभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क, व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक रहिवाशांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर वनविभागाने सापळा रचूनही आता तीन दिवस उलटत आले आहेत. तीन दिवसानंतर ही बिबट्याचा सुगावा लागत नसून बिबट्या नक्की गेला कुठे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS