Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथे बिबट्या  जेरबंद

नाशिक प्रतिनिधी - मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, ओने, खेरवाडी आणि चांदोरी या शिवारात गेल्या काही दिवसांपासून मुक्त संचार करत मोकाट जनावरांवर हल्ला कर

चकलांबा पोलीस स्टेशनच्या वतीने मिलिंद भोसले यांचा सत्कार
ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.
अतिवृष्टीनंतर पाथर्डीकराचे पाण्यावाचून दैना;सोमवार मंगळवारपर्यत प्रतीक्षा करावी लागेल;- नगराध्यक्ष गर्जे यांची माहिती

नाशिक प्रतिनिधी – मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, ओने, खेरवाडी आणि चांदोरी या शिवारात गेल्या काही दिवसांपासून मुक्त संचार करत मोकाट जनावरांवर हल्ला करत असल्याने बिबट्याची मोठी दहशत होती. यामुळे परिसरात शेतकरी संदेश मोगल व सतीश मोगल यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांनी निफाड वनविभागाशी संपर्क साधला त्यांनतर वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबटयाला नविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले  निफाड येथील वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याची तपासणी करून त्यास वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याचे निफाड वनविभागाने सांगितले आहे.

COMMENTS