वाहतूक नियंत्रणासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर

Homeताज्या बातम्याअहमदनगर

वाहतूक नियंत्रणासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर

कर्जत/प्रतिनिधी : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथे रुजू होताच वाहतूक समस्येवर काम सुरू केले. रस्त्यांच्या दुतर्फा दोरी टाकून वाहने पार्

शिष्यवृत्ती परीक्षेत काळे विद्यालयाचे यश
क्षयरोग निवारणासाठी तरुणांनी जनजागृती करावी
निळवंडे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात

कर्जत/प्रतिनिधी : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथे रुजू होताच वाहतूक समस्येवर काम सुरू केले. रस्त्यांच्या दुतर्फा दोरी टाकून वाहने पार्क करण्याबाबत शिस्त लावली. त्यामुळे कोंडलेल्या राज्यमार्गाचा श्वास कित्येक वर्षानंतर मोकळा झाला. मात्र काही काळ गेल्यानंतर वाहतुकीची शिस्त बिघडते. त्यावेळी ते स्वतः रस्त्यावर उतरून चालकांना समजून सांगतात व कारवाई करतात. सध्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  सध्या दिपावली सणाच्या निमित्ताने व सोमवारी भरत असलेल्या आठवडे बाजारासाठी व इतरही वेळेत तालुक्यातून अनेक नागरीक खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठांमध्ये येत आहेत. माल तसेच विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी अनेक व्यावसायिक व दुकानदार आपला माल अगदी रस्त्याच्या कडेलाच मांडत आहेत.

मालाच्या विक्रीसाठी दुकानाबाहेर व रस्त्याच्या कडेला लावून व्यवसायाची स्पर्धा करून वाहतुकीस अडथळे निर्माण करत आहेत.त्यामुळे माल व वस्तू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून आपली वाहने दुसऱ्या दुकानांच्या समोर लावत आहेत.वारंवार सुचना देऊनही न ऐकणाऱ्या नागरिकांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.त्यामुळे बेशिस्त दुकानदार व नागरिकांना पुन्हा एकदा कारवाईस सामोरे जावे लागले.’सर्वच दुकानदार व नागरिकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने पोलिसांनी आखून दिलेल्या दोरीच्या आतच लावावीत.वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने सर्वानाच पश्चाताप होतो आणि त्यात बराचसा वेळही वाया जातो त्यामुळे नागरिक व दुकानदारांनी दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
चौ


सुचनांचे पालन न करणाऱ्यांवर आता खटले
बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतुक नियंत्रणासाठी कर्जत पोलीसांकडुन उपाययोजना करण्यात येत आहेत.सर्वांकडून सहकार्य होत आहे.राज्यमार्गही मोकळा होत असुन वाहतुकीला शिस्त लागली आहे.मात्र वारंवार सांगूनही जे नागरीक सुचना व नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर आता खटले भरवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

COMMENTS