बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा शहरातील मलकापूर रोडजवळ बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या मागे असलेल्या म्हाडा कॉलनीतील एका रो हाउसची सुरक्षा भिंत ओलांडून
बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा शहरातील मलकापूर रोडजवळ बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या मागे असलेल्या म्हाडा कॉलनीतील एका रो हाउसची सुरक्षा भिंत ओलांडून बिबट्याने कुत्र्याचे पिल्लू उचलून नेल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे.अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर बुलढाणा शहरालगतच जंगलाला लागून म्हाडा कॉलनी उभारण्यात आली आहे.. जंगलव्याप्त हा भाग असल्याने या भागात अनेकदा हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन होत असते. बिबट व अस्वलाचाही अनेकांनी वावर या भागात पाहिलेला आहे..दरम्यान म्हाडा कॉलनीमध्ये रो हाउससुद्धा बांधण्यात आलेले आहे.. एका रो हाउसमध्ये बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे कार्यालय असून काही कर्मचारी तेथे राहतात.सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी दोन कुत्र्यांची पिल्ले पाळली आहेत. २फेब्रुवारी रोजी सकाळी त्यातील एक पिल्लू दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता
सुरक्षा भिंत ओलांडून एका बिबट्याने आत प्रवेश केला व कुत्र्याचे पिल्लूउचलून नेल्याचे स्पष्ट झाले..त्यामुळे या भागत घबराट निर्माण झाली आहे
COMMENTS