Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळदर येथे नवजात वासरावर बिबट्याचा हल्ला 

सटाणा: तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला असून पिंपळदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळदर येथील शे

देशभरात 2 लाख कोटींचे बोगदे : गडकरी
टाटा हॅरियर ही कार देखील इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करू शकते.
चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

सटाणा: तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला असून पिंपळदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळदर येथील शेतकरी संतोष लुकडू गवळी हे आपल्या गट नंबर १३५/२ मध्ये रात्री भेंडी पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते, थ्री फेज वीज येण्याची वेळ ही रात्रीची असल्यामुळे तसेच त्यांची गाय नुकतीच व्याली असल्यामुळे संतोष गवळी हे सायंकाळी अंधार पडण्या अगोदरच शेताकडे गेले असता त्यांना आपल्या गाईचे नवजात वासरू गायब असल्याचे दिसले त्यांनी बाजूच्या मोठ्या बांधाकडे जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या त्या वासराला खाताना दिसला त्यावेळेस संतोष गवळी हे पूर्णपणे घाबरून घराकडे निघून आले, त्यांनी वनरक्षक आर.पी.निकम यांना फोनवरून सर्व हकीकत कथन करून सांगितली. पिंपळदर परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनरक्षक आर. पी. निकम यांनी आपले वरिष्ठ वनपाल एस. एन. पवार यांना सर्व माहिती कळविली व पिंजरा लावण्याची मागणी केली वरिष्ठांनी देखील त्याला होकार देत लगेच पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. पिंजरा लावण्यासाठी वनपाल एस. एन. पवार, वनरक्षक आर.पी. निकम, के. व्ही. मोहिते, एन. एम. मोरे हे उपस्थित राहून पिंजरा लावण्यात आला.

COMMENTS