Homeताज्या बातम्याशहरं

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा जागरुकता शिबीर

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, भरोसा कक्ष, सातारा पोलीस, मैत्री नेट

कोल्हापूरमध्ये ट्रॅपचे आणखी दोन प्रकार उघड; दोन व्यापार्‍यांना 36 लाखाला लुटले
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक होणार? शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
आ. गोरेंना तत्काळ अटक करा; अन्यथा 25 ला आंदोलन; जनता क्रांती दलाचा इशारा

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, भरोसा कक्ष, सातारा पोलीस, मैत्री नेटवर्क आणि निर्माण संस्था पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच शिवतेज हॉल, तालुका पोलीस स्टेशन, सातारा येथे कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, बालकांवरील लैंगिक अत्याचार व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 आणि बाल विवाह कायदा या विषयी विधी सेवा जागरुकता शिबीर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी दिवाणी न्यायाधीश प्रविण भिर्डे यांनी विविध उदाहरणे देवून महिलांनी दक्षता कशी घ्यावी. छळ झाल्यास तक्रार कशी करावी, याची माहिती दिली. कायद्यामध्ये काय तरतूदी आहेत हे सविस्तर सांगून, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ व लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने असणार्‍या सीआरपीसीमधील तरतूदी या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
सपोनिभरोसा कक्ष अनिता अमंदे मेणकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 विषयी पीपीटीद्वारे माहिती दिली. या कायद्यान्वये कशा प्रकारे संरक्षण दिले जाते याविषयी मार्गदर्शन केले. या कायद्यान्वये महिलांना कशा प्रकारे सहाय्य केले जाते, संरक्षण अधिकारी कोण असतात, याबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी आपल्या आजुबाजूच्या पिडीत महिलांना मदत करावी व योग्य ती माहिती संबंधिताना पुरवावी. पॅनेल विधिज्ञ जान्हवी जोशी यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 व बाल विवाह कायदा यामधील तरतूदी काय आहेत. त्यानुसार काय संरक्षण दिले जाते व त्याचे काय परिणाम होतात याबाबत सखोल माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्ह्यातील पोलीस पाटील, सरपंच, तरुण मंडळाचे अध्यक्ष, बचत गटाचे अध्यक्ष, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी व समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल गायकवाड तर आभार प्रदर्शन दिलीप भोसले यांनी केले.

COMMENTS