किल्लेधारूर प्रतिनिधी - किल्ले धारूर येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बालसंस्कार केंद्र येथे आज( दि. 12) शनिवार रोजी जागतिक युवा दिवस, रँकिंग
किल्लेधारूर प्रतिनिधी – किल्ले धारूर येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बालसंस्कार केंद्र येथे आज( दि. 12) शनिवार रोजी जागतिक युवा दिवस, रँकिंग विरोधी कायदा, रोड ट्रॅफिक व इतर कायदेविषयक माहिती व जनजागृती मार्गदर्शन शिबीराचे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किल्ले धारूरचे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. कदम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणूनवकिल संघाचे अध्यक्ष पी डी मिश्रा, अमित मिश्रा, आर व्ही अवस्थी, ए एस साखरे,कुंदन शुक्ला, नाईकवाडे, गुळवे, सोळंके व विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख एस एस होते. प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मार्गदर्शक कदम यांनी विद्यार्थ्यांना जागतिक युवा दिवस रोड ट्रॅफिक रॅगिंग विरोधी कायदे याविषयी विद्यार्थ्यांना त्यांच्या बालभाषेत आनंदी व उत्साही वातावरणात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक सचिन चव्हाण सर यांनी केले. तर प्रास्ताविक पी डी मिश्रा व आभार प्रदर्शन कुंदन शुक्ला यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षेत्तर कर्मचारांनी यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS