Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणंद येथे शिवजयंती दिनी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान; इतिहास संशोधकाच्या शब्दांची धार पुन्हा गरजणार

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपिस 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा
आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम
कदमवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबास शिवसमर्थ संस्थेची आर्थिक मदत

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाज मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष दशरथ इंदलकर आणि उपाध्यक्ष शुभम दरेकर यांनी दिली.
छत्रपती शिवराय व वर्तमान या विषयावर श्रीमंत कोकाटे हे व्याख्यान देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रचंड गाढा अभ्यास असणारे इतिहास अभ्यासक आणि सुप्रसिध्द संशोधक म्हणून श्रीमंत कोकाटे हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. यापूर्वी श्रीमंत कोकाटे यांनी लोणंदमध्ये व्याख्यान दिलेले आहेत. श्रीमंत कोकाटे यांना लोणंद येथे पुन्हा ऐकण्याची संधी लोणंदकरांना प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा श्रीमंत कोकाटे या इतिहास संशोधकाच्या शब्दांची धार पुन्हा गरजणार आहे. याबद्दल मराठा समाज मंडळ यांना ही विशेष धन्यवाद दिले जात आहेत.
भव्य सार्वजनिक शिवजयंती सोहळा होत असताना या कार्यक्रम प्रसंगी लोणंद नगरीच्या नगराध्यक्ष मधुमती पलंगे कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे असणार आहेत. व्याख्यानाचा कार्यक्रम शनिवार,
दि. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नगरपंचायत पटांगण येथे होणार आहे. कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

COMMENTS