Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळातून शेतीसाठी आवर्तन सोडा अन्यथा शेतकर्‍यांसह घेणार धरणात जलसमाधी

नेवासा काँग्रेसचा मुळा पाटबंधारे अभियंत्यांना दिला निवेदनाद्वारे इशारा

 नेवासा फाटा/प्रतिनिधी :  मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे. अन्यथा शेतकर्‍यांसह मुळा धरणात जलसमाधी घेवून आंदोलन करण्यात येईल. अशा इशार

भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज
शासकीय योजनांचा जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा
सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर चोरणारा एक अटक, दोन पसार.     

 नेवासा फाटा/प्रतिनिधी :  मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे. अन्यथा शेतकर्‍यांसह मुळा धरणात जलसमाधी घेवून आंदोलन करण्यात येईल. अशा इशाराचे निवेदन सोमवारी,दि.28 ऑगस्ट रोजी नेवासा काँग्रेसकडून मुळा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देण्यात आले.
नेवासा तालुका काँग्रेस कमिटी व शेतकर्‍यांनी अहमदनगर येथे मुळा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे अशी मागणी केली. जर येत्या आठवडा भरात पाणी सोडले नाही. तर शेतकर्‍यांसह मुळा धरणात जलसमाधी घेणार असे निवेदनात म्हटले आहे. पावसाळा ऋतू सुरू होवून तीन महिने उलटूनही समाधान कारक पाऊस न पडल्याने संपूर्ण राज्यातील शेतकरी हैराण झाला आहे. खरिपात केलेल्या सोयाबीन, कापूस, व इतर पिकांच्या लागवडीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून घेतलेली पिके शेवटची घटका मोजत आहेत. तर दुबार पेरणीचे संकट देखिल पुढे उभे  ठाकले आहे. मोठे नुकसान होवूनही अजून पंचनामा हा शब्द देखिल कोणी उच्चारत नाही. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच जर मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडल्यास ही पिके काही प्रमाणात वाचवू शकतात. सद्य परिस्थितीत मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे. एव्हढीच अपेक्षा आता शेतकर्‍याना दिसत आहे.
 यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी राजकीय पक्षातील नेत्यांना फक्त सत्ता कशी मिळेल. कोणासोबत जायचे.किती खोके मिळतील हेच दिसत आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे काय हाल चालू आहेत हे मात्र दिसेना. निवडणुका तोंडावर आल्या की शेतकरी दिसतो. आता कोणीच बोलायला तयार नाही. आज कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली असताना कोणीही बोलायला तयार नाही. हीच मोठी खंत आहे. धरणातील हक्काच्या पाण्यासाठी लढा देणार असे स्पष्ट केले. निवेदन देते वेळी जिल्हा काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा शेतकरी व कामगाराचा पक्ष असून त्यांच्या काँग्रेस पक्ष कायम पाठीशी आहे. आज शेतकर्‍यावर मोठे संकट आले आहे. त्यामूळे जर दोन तीन दिवसात पाणी सोडले नाही. तर शेतकर्‍यांसह मी सुद्धा जलसमाधी घेईल. अशी भूमिका स्पष्ट केली. निवेदन देतेवेळी नेवासा शहराध्यक्ष अंजुम पटेल, जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, उपाध्यक्ष सतिष तर्‍हाळ, मुसा बागवान, द्वारकणाथ जाधव, किरण साठे, दिलीप पवार, नंदु कांबळे, गोरक्षनाथ काळे, संजय होडगर, मोहन भवाळ, महिला काँग्रेसच्या  शोभा पातारे, मीरा वडागळे, राणी भोसले, ज्योती भोसले, संगीता चांदणे, आदीसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी लवकरच मुळा धरणातून शेतीसाठी चार टीएमसीचे आवर्तन सोडण्यात येईल असे स्पष्ट केले.
प्रतिक्रिया :- शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांना आज जर मदत केली नाही. तर शेतकरी उध्वस्त होईल. शेतकर्‍यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आज पक्ष, राजकारण सर्व बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. हक्काच्या पाण्यासाठी लढा द्यावा. दुष्काळ जाहिर करण्यासाठी लढा द्यावा – राजेंद्र वाघमारे.

COMMENTS