Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड

कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त

धुळे / प्रतिनिधी : शहरातील वाडीभोकर परिसरात एलसीबीच्या पथकाने एका घरावर धाड टाकून बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत बनावट दारुस

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
अखेर तळोदा परिसरातील बिबट्या जेरबंद
राजकोट किल्ल्यावर रविवारी जाणार ः मनोज जरांगे

धुळे / प्रतिनिधी : शहरातील वाडीभोकर परिसरात एलसीबीच्या पथकाने एका घरावर धाड टाकून बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत बनावट दारुसह गांजाचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात नाल्या किनारी एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने तत्काळ मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला.

कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त – यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे 200 लिटर स्पिरीटचा साठा पोलिसांच्या हाती लागला. शिवाय बनावट मद्याच्या बाटल्यांची सात खोकी आढळली. यासह पोलिसांनी या ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास 150 गोण्या भरून गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.

COMMENTS