Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली कोर्टात महिलेवर वकिलाकडून गोळीबार

तीन गोळ्या लागल्यामुळे महिला गंभीर जखमी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः उत्तरप्रदेशातील अतिक अहमदची हत्या करण्यासाठी आरोपी पत्रकार म्हणून आल्याची घटना समोर असतांना, दिल्लीतील साकेत कोर्टात एका म

Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)
राजीनामा अन् कार्यकर्त्यांचा हुंदका
राज्यपालांचा मराठीद्वेष

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः उत्तरप्रदेशातील अतिक अहमदची हत्या करण्यासाठी आरोपी पत्रकार म्हणून आल्याची घटना समोर असतांना, दिल्लीतील साकेत कोर्टात एका महिलेवर वकिलाकडून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या वकिलाने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला.
महिलेला दोन गोळ्या पोटात आणि एक हातात लागली. महिलेला तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला आर्थिक वादाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेली होती. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या ब्लॉकबाहेर दोघांमध्ये बाचाबाची झाली. अचानक ती महिला हल्लेखोराच्या दिशेने चालत जाते, तेवढ्यात तो मागे सरकतो आणि महिलेवर गोळीबार करू लागतो. महिलेच्या पोटात दोन गोळ्या लागल्या आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर तेथून निघून गेला. कामेश्‍वर प्रसाद सिंह उर्फ बिनोद सिंह असे हल्लेखोराचे नाव आहे. एका वेगळ्या प्रकरणात बार कौन्सिलने आरोपीला निलंबित केले होते. हल्ला करणार्‍या वकिलाने पीडित महिलेला 25 लाख रुपये दिल्याचा दावा केला जात आहे. नंतर ही महिला पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण-पश्‍चिम दिल्लीतील द्वारकामध्ये अशीच एक घटना समोर आली होती. एका वकिलाची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेतही हल्लेखोर वकिलांच्या वेशात होते. या घटनेनंतर वकिलांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की त्यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. दिल्लीत वकिलांचे संरक्षण कायदा करावा, असे ते म्हणाले होते.

COMMENTS