Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्‍नोई कनेक्शन !

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गँगस्टर लॉरेन

लोकअदालतला महावितरणच्या ग्राहकांचा प्रतिसाद ; नाशिक परिमंडलात ग्राहकांनी केला २५ लाख रुपयांचा भरणा
५२ वर्षीय शिक्षकाने केला ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार | LOKNews24
वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक स्व. पुरूषोत्तम लोंढे यांचा जन्मशताब्दी महोत्सव उत्साहात

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्‍नोईच्या टोळीने घटनेच्या 28 तासांनंतर हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स गँगने सलमान खानला सोशल मीडियावर धमकीही दिली आहे. तुझ्यामुळे अनुज थापनचे नुकसान झाल्याचे गँगने सलमानला सांगितले आहे.
वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये आलेल्या 3 शूटर्सनी दोन बंदुकांमधून 6 राऊंड फायर केले. बाबांना तीन गोळ्या लागल्या. त्यांच्या पोटात 2 आणि छातीवर 1 गोळी लागली. तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. चौकशीदरम्यान, दोन्ही शूटर्सने सांगितले की ते गेल्या दोन महिन्यांपासून बाबा सिद्दिकी यांच्या घराची आणि मुलाच्या ऑफिसची रेकी करत होते. या घटनेत गँगस्टर लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय आहे. लॉरेन्स गँगचे नाव समोर आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या घरासमोर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. लॉरेन्स गँगने 14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. सूत्रांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी एकत्र निघाले होते, मात्र त्यानंतर झिशानचा फोन आला आणि तो ऑफिसमध्ये गेला. हल्लेखोरांनी मिळून दोघांची हत्या करण्याचा कट रचला होता. हल्ला झाला त्यावेळी पथदिवे बंद होते. घटनास्थळी सीसीटीव्हीही लावण्यात आले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी कर्नैल सिंग हा हरियाणाचा रहिवासी आहे. दुसरा आरोपी धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे.

वाय दर्जाची सुरक्षा असतांनाही हत्या
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची गाडी बुलेटप्रुफ होती, तरीही गोळी काचेत घुसली. हल्लेखोरांकडे 9.9 एमएमचे अत्याधुनिक पिस्तूल होते असे समजते. 15 दिवसांपूर्वी सिद्दिकींना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाच्ी सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र हल्ला झाला त्यावेळी सुरक्षा यंत्रणा कुठे होते, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अडीच लाख रुपयांत घेतली सुपारी
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांना ठार मारण्यासाठी 4 आरोपींनी सुपारी घेतली होती. यातील 3 आरोपी हे पंजाबमधील एका तुरुंगात होते. या ठिकाणी त्यांची बिश्‍नोई गँगच्या शूटर्सची ओळख झाली. यानंतर त्यांनी बिश्‍नोई गैंगमध्ये सामील होत, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी ठेतली. तब्बल अडीच लाख रुपयांची सुपारी त्यांनी घेतली.

पंजाबच्या जेलमध्ये शिजला हत्येचा कट!
माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाले असून ही सुपारी बिश्‍नोई गँगने घेतल्याचे उघड झाले आहे. बिश्‍नोई गँगच्या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. तर मार्गदर्शन करणार्‍या चौथ्या आरोपीचा शोध देखील पोलिस घेत आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की पंजाबमधील तुरुंगात असतांना त्यांनी हत्येचा कट रचला. यावेळी त्यांची बिश्‍नोई गँगशी ओळख झाली.

सलमान खानला बिश्‍नोई गँगने दिला इशारा
लॉरेन्स बिश्‍नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पोलिस या पोस्टची तथ्यता तपासत आहेत. हा कुणाचा खोडसाळपणा होता की, बिश्‍नोई गँगनेच ही पोस्ट केली? याची चौकशी होत आहे. दरम्यान ज्या अकाऊंटवरून पोस्ट टाकली गेली, तो स्वतःला बिश्‍नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत आहे.

COMMENTS