Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलाकारांच्या बालेकिल्ल्यात लावण्यवतींने साजरा केला जल्लोष

राजलक्ष्मी ग्रुप, ड्रिमलँड इव्हेंट्स आयोजित राज्यस्तरीय लावणी स्पर्धा संपन्न

बीड प्रतिनिधी - कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा अशी ओळख बीड जिल्ह्याची अवघ्या महाराष्ट्रभरात आणि देशभरात सर्वश्रुत आहे. याच कलाकारांच्या बालेकि

दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू
पाटपाण्याच्या नियोजनाला अधिकार्‍यांची आडकाठी
मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार | LOKNews24

बीड प्रतिनिधी – कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा अशी ओळख बीड जिल्ह्याची अवघ्या महाराष्ट्रभरात आणि देशभरात सर्वश्रुत आहे. याच कलाकारांच्या बालेकिल्लात दिनांक 22 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे राज्यस्तरीय लावणी महोत्सव संपन्न झाला.  राज्यभरातून या स्पर्धेसाठी लावण्यवतीने आपला सहभाग नोंदवला होता. अतिशय बहरदार आणि ठसकेबाज लावणी नृत्याचे सादरीकरण करून लावण्यवतीने कलाकारांच्या बालेकिल्ल्यात जल्लोष साजरा केला.
राजलक्ष्मी ग्रुप आणि ड्रीमलँड इव्हेंट्स यांनी एकत्रित येऊन बीडमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केला होता. स्पर्धेचे उदघाटन नटराज पूजन आणि दिप प्रज्वलन करून पप्पू काकदे यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कार्यक्रमात सदिच्छा भेट देऊन आपल्या मनोगत भाषणात आयोजक आणि सहभागी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. यानंतर लागलीच लावणी स्पर्धेस सुरुवार करण्यात आली. एकपेक्षा एक अशा लावणी नृत्याचं सादरीकरण बीडकरांना पाहायला मिळाले. बहारदार अशा लावणी नृत्याचे सादरीकरण पाहून बीडकर भारावून गेल्याचे दिसून येत होते.   या स्पर्धेसाठी राज्यभरातून तब्बल 30 लावण्यवतीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यास एकवीस हजार रुपये तर द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यास पंधरा हजार रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यास दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक स्मृतीचिन्ह देण्यात आले. बीडच्या कलाश्री ग्रुप या लावणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त करून बालेकिल्ल्याची शान राखली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंस्टाग्राम स्टार मीनाक्षी बालकमल यांनी केले.

COMMENTS