अन्न विषयक जागृती साठी ‘ईट राईट इंडिया’ अभियानाची सुरुवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न विषयक जागृती साठी ‘ईट राईट इंडिया’ अभियानाची सुरुवात

अहमदनगर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने 'ईट राईट इंडिया' अभियान राबविण्यात येणार आहे. या अभिया

कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज
ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात
तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोडीच्या घटनाची नोंद 

अहमदनगर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ‘ईट राईट इंडिया’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते जनजागृती करणारे ‘बॅनर्स स्टॅण्डी’ चे अनावरण नुकतेच करण्यात आले. तसेच अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या हस्ते ‘बॅनर्स स्टॅण्डी’ चे अनावरण करण्यात आले.

            नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियाना अंतर्गत जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणात ग्राहक व अन्न व्यावसायिक यांच्यामध्ये अन्न विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. पोस्टर्स, बॅनर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या अभियानात ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, क्लिन स्ट्रीट फुड हब, ब्लिसफुल हायजनिक ऑफरिंग टुगॉड अंतर्गत शनीशिंगणापूर व शिर्डी या गावांची  निवड करण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगर अन्न व औषध प्रसाधन विभागाचे सहायक आयुक्त सं.पा.शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

COMMENTS