Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले

तीन दिवसानंत चार वेळा बसले हादरे

लातूर/प्रतिनिधी : किल्लारी येथील भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाले असून, नुकत्याच त्याच्या आठवणी जागवल्या जात असतांना, भूकंपाच्या धक्क्यांनी लातूर पुन्

लडाखमध्ये पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार

लातूर/प्रतिनिधी : किल्लारी येथील भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाले असून, नुकत्याच त्याच्या आठवणी जागवल्या जात असतांना, भूकंपाच्या धक्क्यांनी लातूर पुन्हा हादरले आहे. गेल्या तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के बसले आहे. हे धक्के लातूर जिल्ह्यातील हासोरीसह उस्तुरी भागात बसेले आहे. हे धक्के सौम्य असले तरी यामुळे खिल्लारी भूकंपाच्या आठवणी लातूरकरांना झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या वर्षी देखील या भागात तब्बल 9 भूकंपाचे धक्के जाणवले होते. या वर्षी बुधवारी रात्री 9 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तीन दिवसांत 4 वेळा धक्के बसले असून भूकंपमापकावर याची तीव्रता 1.6 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. लातूरच्या हासोरी आणि उस्तुरी या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासूंन जमिनीखालून गूढ आवाज येत आहेत. तसेच धक्के देखील जाणवत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. हे भूकंपाचे धक्के असल्याचे सिद्ध झाल्याने नागरिक दहशतीत आहे. या महिन्यात 2 ऑक्टोबरला तीन धक्के बसले होते. तर बुधवारी देखील दोन धक्के नागरिकांना जाणवले. नागरिकांनी याची माहिती प्रशासनाला देहूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली गेलेली नाही. फक्त एकच धक्का बसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर ग्रामस्थांनी 4 धक्के बसल्याचे सांगितले. असे असतांनाही प्रशासन दखल घेत नसल्याने हासुरी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. येथील तलाठी बबन राठोड, नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी गावात येत माहिती घेतली. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. तसेच उपाय योजना करण्याची मागणी देखील केली.

COMMENTS