Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात? : कराडला मराठा क्रांती मोर्चाकडून श्रध्दाजंली सभा

कराड / प्रतिनिधी : मराठा आरक्षण प्रश्‍नासाठी आयुष्यातली एक दोन नव्हे तर तब्बल 40 वर्षे पणाला लावलेल्या व आयुष्याच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत मराठा

सैन्य भरतीसाठी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ; युवकाचे अपहरण
सांगलीत महायुतीचा 5 तर महाविकास आघाडीचा 3 जागांवर विजय
कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध

कराड / प्रतिनिधी : मराठा आरक्षण प्रश्‍नासाठी आयुष्यातली एक दोन नव्हे तर तब्बल 40 वर्षे पणाला लावलेल्या व आयुष्याच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत मराठा आरक्षण प्रश्‍नासाठीच संघर्ष करणारे एकमेव मराठा आ. स्व. विनायकराव मेटे हे आहेत. तेव्हा मराठा समाज आज हरपला आहे. त्यामुळे स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कराड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निवेदन तहसिलदार यांना सोमवारी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात स्व. विनायक मेटे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कराड तालुक्यातील विविध संघटना, संस्थाचे पदाधिकारी, नागरिक, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी अनेक वक्त्यांनी स्व. मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या एका शेतकरी कुटुंबातली व्यक्ती मराठा समाजासाठी प्रामाणिक लढा उभारतो. शिवसंग्राम नावाचे राज्यव्यापी संघटन उभारतो आणि एक दोन नव्हे तर 5 टर्म विधान परिषद आमदार होतो आणि मराठा आरक्षण प्रश्‍नी विधानपरिषद गाजवतो.
अमर रहे अमर रहे विनायक मेटे अमर रहे, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा या घोषणांनी शासकीय विश्रामगृह परिसर अक्षरशः दणाणून सोडला. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्व. मेटेच्या अपघाताची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

COMMENTS