Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर पाटण शहरात महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू

चौकट : या मार्गावर वाढलेल्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले होते. जागृत नागरिकांसह विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी विविध माध्यमातून हा मुद्दा सातत्याने मा

अरे ला कारे करत जाब विचारा : रुपालीताई चाकणकर
मसापच्या शाहूपुरी शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर
कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क

पाटण / प्रतिनिधी : गुहागर विजयपूर महामार्गावरील पाटण शहरातील रस्ता रुंदीकरणाचे अनेक वर्षांपासून रखडलेले होते. ते काम अखेर सुरू झाले असून यामध्ये नागरिकांनी जाणीवपूर्वक अडथळा न आणता सहकार्य करणे गरजेचे आहे. याबद्दल दैनिक लोकमंथनने आवाज उठवल्याने अनेक वर्षापासून रखडलेले काम पुन्हा सुरु झाले आहे. याबद्दल दैनिक लोकमंथनचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी बाजारपेठ, विविध शासकीय कार्यालये, संस्था व बँकांमुळे लोकांची मोठी वर्दळ असते. मात्र, शहरातून जाणार्‍या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहनधारक व पादचार्‍यांची गैरसोयीं होत आहे. वाढती वाहन, अरुंद रस्ता आणि बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यासाठी पाटण शहरातील रस्त्याचे रुंदीकरण तातडीने व्हावे, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने व आंदोलने केल्याने अखेर संबंधित प्रशासनाने दखल घेत ठेकेदाराला पाटण शहरातील रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. काही दिवसांपासून शहरालगतच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आता शहरातील अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कारवाई अपरिहार्य असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
रुंदीकरणाच्या कामात गटार बांधणी, दुतर्फा साईडपट्टी तसेच रस्त्याची उंची वाढवण्याचे काम प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुलभ, गतिमान होईल तसेच पर्यटन, शेती व स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल. संबंधित कंत्राटदाराने पाटणमध्ये काम सुरू केले आहे. हे काम वेळेत व विनाअडथळा पूर्ण व्हावे, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत महामार्ग काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS