Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसएसजीएम’मध्ये भाषा विषयक कार्यशाळा उत्साहात 

कोपरगाव : श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षकांसाठी भाषा विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे होते. रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थित शिक्षकांचे कौतुक केले.  या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून शरद दुधाट, संदीप शिंदे, श्रीकांत थोरात व संदीप दरेकर यांनी भाषा विकास, गुणवत्ता सुधारणा तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात प्रमोद तोरणे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार भाषा विकासासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे स्पष्ट केले.  प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी उत्तर विभाग गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांच्यासह उत्तर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे व प्रा. मनिषा निफाडे यांनी केले, तर आभार एकनाथ कळमकर यांनी मानले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना ब्लॅंकेट वाटप 
कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीत नव्यांना संधी : आ. काळे
‘गौतम’-निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये सामंजस्य करार

कोपरगाव : श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षकांसाठी भाषा विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे होते. रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थित शिक्षकांचे कौतुक केले.

 या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून शरद दुधाट, संदीप शिंदे, श्रीकांत थोरात व संदीप दरेकर यांनी भाषा विकास, गुणवत्ता सुधारणा तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात प्रमोद तोरणे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार भाषा विकासासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे स्पष्ट केले.

 प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी उत्तर विभाग गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

 या कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांच्यासह उत्तर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे व प्रा. मनिषा निफाडे यांनी केले, तर आभार एकनाथ कळमकर यांनी मानले.

COMMENTS