Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाषेमुळे देशाची एकता व अखंडता कायम राहते ः प्रा. डॉ. हनुमंत जगताप

बेलापूर ः आज जरी जागतिक ज्ञानाची गरज निर्माण झाली असली तरीही देशाच्या संस्कृतीची सभ्यता हिंदी भाषेमध्ये असल्याने देशाची एकता व अखंडता कायम आहे, अ

गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील
नगरमध्ये विकले जाते नकली रेमन्ड कापड…गुन्हा दाखल
महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू : आ. विखेंचे भाष्य

बेलापूर ः आज जरी जागतिक ज्ञानाची गरज निर्माण झाली असली तरीही देशाच्या संस्कृतीची सभ्यता हिंदी भाषेमध्ये असल्याने देशाची एकता व अखंडता कायम आहे, असे विचार न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हनुमंत जगताप यांनी व्यक्त केले.
         बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राष्ट्रभाषा हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रकाश देशपांडे होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा. सुनीता पठारे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. विलास गायकवाड, प्रा. रूपाली उंडे, प्रा. संजय नवाळे, प्रा. डॉ. अशोक माने, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, प्रा. सतीश पावसे, प्रा. ओंकार मुळे, प्रा. अमृता गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर हनुमंत जगताप पुढे म्हणाले की, ज्या देशाचं, समाजाचं, व्यक्तीचं कर्तव्य मोठं असतं त्यावर आधारित साहित्य निर्माण होतं. त्यातूनच भाषा ही माणसाला श्रेष्ठत्व प्रदान करते. चांगली भाषा शिकण्यासाठी बोलीभाषा पक्की असावी लागते. विविधतेला एक सूत्रात बांधून ठेवून भाव, विचार, कल्पना, भाषा यांचे ज्ञान माणसाकडेच असते. एकाकडून दुसर्‍याकडे ज्ञान परावर्तित होण्याची ही जी साधनं आहेत त्यामुळेच भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडिया, टी.व्ही. यापासून लांब राहून वाचनाची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. प्रकाश देशपांडे यांनी कोणतीही भाषा शिकण्यासाठी संवादाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी मेहेत्रे हिने केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. सुनीता पठारे यांनी मानले. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गुंफा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. 

COMMENTS