Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमधील 211 गावांना भूस्खलनाचा धोका

राज्य सरकारकडून या गावांना हायअलर्ट जारी

मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव या भूस्खलनात गाडले गेले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झ

उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांची मत क्रिया प्रभावी राहणार
राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध
आमदार डॉ. लाहमटे यांच्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्‍न मार्गी

मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव या भूस्खलनात गाडले गेले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला तर 78 लोक बेपत्ता झाले. 124 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर आता राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी हायअलर्ट जारी केला असून, या जिल्ह्यातील 211 गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे बुधवारी विधानपरिषदेत जाहीर केले आहे.
रायगड जिल्ह्यात अशाच दरड कोसळण्याच्या अनेक घटना या भागात घडू शकतात, रायगडसह कोकणातील 211 गावांमध्ये भूस्खलन होण्याचा अथवा दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये दुर्घटना घडू शकतात. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्यातील किती गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे?, असा प्रश्‍न विधानपरिषदेत विचारला होता. त्यावर मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील उत्तर देताना म्हणाले की, रायगडमधील इर्शाळवाडी घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अनेक गावांना आहे. कोकणातील अशी एकूण 211 गावे आहे, ज्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळंच आम्ही रायगड जिल्हा प्रशासनाला हायअलर्टवर राहण्याचा इशारा दिल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकणातील पोलिस, स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोकणात दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू होता, त्यामुळे इर्शाळवाडी गावातील काही तरुण शाळेत झोपायला गेली होती. परंतु डोंगरावरून काही तरी मोठा आवाज येताच मुलांनी जीवाच्या आकांताने गावाबाहेर धाव घेतली. परंतु भूस्खलन झाल्याने इर्शाळवाडीतील किमान 100 ते 1500 कुटुंब घरासह गाडली गेली. भूस्खलनाच्या या घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 78 लोकांचा शोध लागू शकला नाही. याशिवाय 124 लोकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले होते.

COMMENTS