Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील 100 किल्ल्यांवर लँड जिहाद

आ. टी राजा यांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई / प्रतिनिधी : मुस्लिमांनी लँड जिहाद करत महाराष्ट्रातील 100 लहान-मोठ्या किल्ल्यांवर मशिदी आणि दर्गे बांधले आहेत. त्या किल्ल्यांना विधानसभा न

डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा

मुंबई / प्रतिनिधी : मुस्लिमांनी लँड जिहाद करत महाराष्ट्रातील 100 लहान-मोठ्या किल्ल्यांवर मशिदी आणि दर्गे बांधले आहेत. त्या किल्ल्यांना विधानसभा निवडणूकीपूर्वी लँड जिहादमुक्त करावे, अशी विनंती तेलंगणा राज्यातील भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली आहे. या खळबळजनक वक्तव्यानंतर सोशल मिडियावर गदारोळ झाला. हे प्रकरण चिघळू नये म्हणून आ. टी. राजा सिंह तेलंगणा येथे पोहोचल्यानंतर तात्काळ राजीव गांधी विमानतळावरच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

मुंबईतील भिवंडीत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तेलंगणाचे भाजप आ. टी राजा सिंह मार्गदर्शक उपस्थित होते. नेहमीच वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिध्द असणार्‍या टी राजा यांनी या सभेतही आपल्या दाव्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राती राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आ. टी. राजा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 370 किल्ले जिंकले होते. पण दुर्दैव असे आहे की, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच 100 किल्ल्यांवर मशीदी व दर्गे बांधण्यात आले आहेत. यावेळी टी राजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गड-किल्ल्यांवरील मशीदी आणि दर्गे हटवण्याची विनंती केली आहे. तसेच सभेत बोलताना टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील मठ, मंदिरे आणि गड-किल्ल्यांवर भाष्य केले. यावेळी हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा, वक्फ बोर्ड कायदा, लव जिहाद विरोधी कायदा, गोहत्या बंदी कायदा मंजूर करण्याची मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला. ज्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आ. टी. राजा सिंह यांना तात्काळ राजीव गांधी विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल सरकारने कारवाई करावी. महाराष्ट्रामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला धक्का पोहचविण्याचे काम महाराष्ट्रातील भाजप सरकार करत असेल तर काँग्रेस सहन करणार नाही. असा थेट इशारा देत टी राजाच्या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS