Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवघ्या दोन दिवसात लाखभर लोकांचा प्रवास

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईचा प्रवास म्हणजे कंटाळवाणा. रेल्वे लोकलला असलेली गर्दी, आणि त्यातून कामांवर जाण्याची घाई यातून मुंबईकरांची कधी सुटका होईल,

कोरोना कहरः बॉलिवूडचा अवघा पन्नास कोटींचा गल्ला
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईचा प्रवास म्हणजे कंटाळवाणा. रेल्वे लोकलला असलेली गर्दी, आणि त्यातून कामांवर जाण्याची घाई यातून मुंबईकरांची कधी सुटका होईल, असे नेहमीच विचारले जात होते. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झाली असून, तिचे वेगाने विस्तारीकरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत एमएमआरडीएने दोन मेट्रो सेवांचे लोकार्पण झाल्यानंतर अल्पावधीतच या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये एक लाख़ांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो रेल्वेच्या 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर प्रवास केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या दोन्ही सेवांचे लोकार्पण नुकतेच झाले आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ मार्गावर 19 जानेवारीला 34 हजार 128 प्रवाशांनी प्रवास केला. तर 20 जानेवारीला दोन्ही मार्गावर 84 हजार 929 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये मेट्रो 7 च्या तुलनेत मेट्रो 2 अ साठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी मेट्रो 2 अ चा वापर 48 हजार 813 जणांनी केला. तर गुरूवारी 17 हजार 760 जणांनी या पर्यायाचा वापर केला होता. तुलनेत मेट्रो 7 चा वापर शुक्रवारी 36 हजार 116 जणांनी केला.

COMMENTS