Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेक लाडकी करणार लखपती

शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड ’नमो शेतकरी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यास मंजुरी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. ’नमो शेतकरी’ योजनेच्या पह

वाहन देवाण घेवणीच्या वादातून गोळीबार करणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .
एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोडले कामगारांपुढे हात !

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. ’नमो शेतकरी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यास मंजुरी दिल्यामुळे शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच पहिला हप्ता मिळणार आहे. यासोबतच राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.

राज्य सरकारने नमो योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी देत 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. राज्य सरकाच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकर्‍याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. शिंदे सरकारने काल मंगळवारी नमो योजनेच्या पहिल्या हफ्त्यास मंजुरी दिली असून एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील पहिला हफ्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकर्‍यांना आता नमो आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना घोषणा केली होती. पहिल्या हफ्त्यांतर्गत दिवाळीच्या आधी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच लेक लाडकी योजनेनुसार पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.  माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून जन्मणार्‍या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणार्‍या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.  जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

राहात्यात सुरू होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय – अहमदनगर, आणि सांगली जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. 19 नियमित पदे व 6 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण 2 कोटी 13 लाख 76 हजार 424 इतका खर्च येईल. कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण 1336 प्रकरणे वर्ग होणार आहेत.  राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS