Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

देवळाली प्रवरा येथील घटना

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडीत यांच्या घराजवळील नाराळाच्या झावळ्या तोडीत असताना मुख्य वीज वाहिनीवर तोडलेली झाव

विठ्ठलराव वाडगे यांना सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्रदान
विखेंनंतर आता बाळासाहेब थोरात करणार संगमनेरमध्ये शक्तीप्रदर्शन…
…तर, शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही – केसरकर    

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडीत यांच्या घराजवळील नाराळाच्या झावळ्या तोडीत असताना मुख्य वीज वाहिनीवर तोडलेली झावळी पडली. ही झावळी ओढीत असताना तरुण मजूर मनोज दामोदर उमाप (वय 30 वर्ष) यास विजेचा शॉक लागून जागीच ठार झाला.
       याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल राजवाडा भागातील सुरेश पंडीत यांच्या घरा जवळील नाराळाच्या झाडाच्या झावळ्या तोडण्यासाठी सुरेश पंडीत याने मनोज ऊमाप या मजुरास सांगितले होते. उमाप हा नारळाच्या झावळ्या तोडीत असताना एक झावळी मुख्य विज वाहिनीच्या तारेत गुंतली हि झावळी ओढण्यासाठी ऊमाप याने झावळीस हात लावताच विजेचा जबरदस्त शाँक बसल्याने झावळीस चिटकुन बसला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळावरुन रविंद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहीनीतून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुञांनी सांगितले. राहुरी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती वैद्यकिय सुञांनी दिली असता राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यू ची नोंद केली आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात मनोज ऊमाप याचा लहान बंधु याने सुरेश पंडीत हा माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे पोलिसांना ओरडून सांगत होता. पंडीत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईक करत होते. राहुरी पोलिसांनी मात्र आकस्मत मृत्यू चा गुन्हा दाखल करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

COMMENTS