Homeताज्या बातम्यासंपादकीय

कुंकवाचा टिळा आणि स्त्री हक्क!

ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ही अतिशय जोरात होती. या चळवळीने स्त्रियांच्या अस्मितेला सर्वांकष रूप देत महाराष्ट्र मध्ये प्रबोधन

कोरोना लसीकरणाने मृत्यू नव्हेच! 
अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!
विरोधी सत्तेत असताना प्लॅंचेट, आता जोतिष ! 

ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ही अतिशय जोरात होती. या चळवळीने स्त्रियांच्या अस्मितेला सर्वांकष रूप देत महाराष्ट्र मध्ये प्रबोधन आणि विचारांचे अनुषंगाने परिवर्तनाचे धोरण स्वीकारले होते; हे परिवर्तन म्हणजे सामाजिक पातळीवर स्त्रियांचा समान हक्क केवळ मिळवून देणे एवढेच नव्हते, तर, या चळवळीचा प्रधान  उद्देश होता स्त्री समान आहे, सर्वांच्या हे ठसवणे होते. याच काळात स्त्रियांच्या माथ्यावरील कुंकू किंवा लाल बिंदी या संदर्भातही काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. स्त्रियांनी कुंकू लावावा की लाल रंगाची टिकली किंवा लावावी किंवा लावू नये या संदर्भातले अनेक वादविवाद या काळात घडले. त्यावेळी स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रभावाने महिलांच्या कपाळावरचा कुंकू हळूहळू लोक पावत असताना तोच कुंकू हिंदुत्वाच्या नावाखाली पुरुषांच्या कपाळावर स्थिरावयालाही याच काळात सुरुवात झाली होती. आज या कुंकू प्रकरणाची आठवण होण्यामागचे कारण असे की, नुकतेच संभाजी भिडे यांनी पत्रकार महिलेच्या कपाळावर कुंकू नसेल तर, आपण त्या महिलेशी वार्तालाप करणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका जाहीर करण्यातून जो वाद उफाळला आहे, त्या अनुषंगानेच आज ही आठवण लिहायला घेतली. खरे तर अशा प्रकारचा वाद होण्यामागे काही परिस्थिती पूर्वनियोजित ठरवली गेलेली असते; उस्फूर्तपणे असा वाद कधीही उफाळत नसतो. त्यामुळे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी असे विषय प्रसार माध्यमातून पुढे आणले जातात किंवा ‘यालाच प्लॉटिंग’ केलेला विषय असे संबोधणे अधिक योग्य ठरेल. या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका केल्याचे दिसून येते. अमृता फडणवीस या हिंदुत्ववादाच्या पुरस्कर्त्या असल्या तरी हिंदुत्ववादाची मुहूर्तमेढ होणारे संभाजी भिडे, यांच्या वक्तव्याशी त्यांनी ज्या पद्धतीने मतभेद व्यक्त केला, याचा अर्थ स्त्रियांच्या हक्कासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन किंमत चुकविण्याची स्त्रियांची तयारी आहे! त्यासाठी प्रसंगी एकाच सामाजिक विचारांच्या सीमा उल्लंघून त्यापलीकडे जाऊन आपला वैचारिक संघर्ष करण्याची स्रियांची मानसिकता यातून व्यक्त होताना दिसते. कोणत्याही समाज व्यवस्थेत किंवा जगातल्या कोणत्याही देशात एकूण समाज व्यवस्थेचा निम्मा हिस्सा असलेल्या स्त्रिया आज एकविसाव्या शतकात आपला स्वतंत्र अधिकार जगावर बिंबवत असताना, आपल्या  देशातील स्त्रियाही यात मागे पडणार नाहीत; कारण या देशातील वैचारिक प्रबोधन स्त्रियांमध्ये खूप आधीच झालेले आहे. त्यामुळे स्त्रियांना कैद करू पाहणारा किंवा स्त्रियांवर गुलामी लादू पाहणारा किंवा स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा कोणताही विचार किंवा कृती या पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही, हेच या संदर्भात स्त्री संघटना, स्त्रियांचा आयोग आणि एकूण स्त्री चळवळीने जो उभा केला आहे, त्यातून दिसून येते. संभाजी भिडे हे हिंदुत्ववादाचे पुरस्कार ते किंवा प्रेरक असले तरीही हिंदुत्ववादाच्या अंतर्गतही स्त्रियांनी आता आपली समतावादी भूमिका स्वतंत्रपणे घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थात ती केवळ सुरवात नाहीए, तर, समाजव्यवस्था म्हणून आम्ही पुरुषांच्या बरोबरीनेच कुठल्याही क्षेत्रात स्वतःला कमी मानत नाहीत त्यामुळे स्त्रियांचा अनादर करणे किंवा स्त्रियांवर एखादी गोष्ट लादणं, हे या पुढील काळात सहन केले जाणार नाही अशीच भूमिका हिंदुत्ववादी स्त्रियांच्या प्रतिक्रियेतूनही यात दिसून येते आहे! यामुळेच हिंदुत्ववाद किंवा कुठलाही विचार असेल किंवा तत्त्वज्ञान असेल तर ते समान विचारांचे म्हणून स्त्रियांना आता परावलंबी किंवा पारतंत्र्यात लोटू शकत नाही हाच याचा मतितार्थ आहे.

COMMENTS